रत्नागिरी : येथील इन्फिगो फाउंडेशनकडून महिला दिनानिमित्ताने रत्नागिरीत महिलांकरिता कौशल्य विकास प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
आजकाल विविध प्रकारची ज्वेलरी बाजारात उपलब्ध आहे. मुली आणि महिलांना अशी आकर्षक ज्वेलरी फार आवडते. अनेकींना अशी आधुनिक ज्वेलरी स्वतः करायची इच्छा असते, तर काहींना तयार करता येत असली तरी विविध डिझाइन्स मिळाली तर हवी असतात. पण आपल्या आजूबाजूला पटकन असे काही उपलब्ध होतेच असे नाही. हाच मुद्दा विचारात घेऊन इन्फिगो फाउंडेशनने सामाजिक जाणिवेतून व महिलांनी दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वावलंबी व्हावे याकरिता रत्नागिरीमध्ये आधुनिक ज्वेलरी मेकिंगचे कौशल्य प्रशिक्षण शहरी व ग्रामीण भागातील महिलांसाठी खास आयोजित केले आहे. मुंबईच्या सुप्रसिद्ध डिझाइन व ज्वेलरी मेकर सौ. अश्विनी करकरे प्रशिक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
येत्या गुरुवारी, दि. ६ मार्च रोजी सकाळी ११ ते ६ या वेळेत शहरी महिलांसाठी, तर शुक्रवारी, दि. ७ मार्च रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत ग्रामीण भागातील महिलांसाठी हे प्रशिक्षण होणार आहे. प्रशिक्षण रत्नागिरीत इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलमध्ये होईल. यामध्ये लागणारे विशेष प्रकारचे साहित्य इन्फिगो फाउंडेशनतर्फे देण्यात येणार आहे. याशिवाय स्वतः तयार केलेला बांगड्या, हार व कानातील अलंकार असा सेट प्रत्येकीला मोफत मिळणार आहे. पाच जणींच्या गटाने नोंदणी केल्यास गटाला कात्र्यांचा एक सेट मोफत दिला जाणार आहे.
प्रशिक्षणादरम्यान चहा, अल्पोपाहाराची सोय करण्यात आली आहे. सहभागासाठी ९४२०६२७५०५ या क्रमांकावर नोंदणी करावी. इच्छुकाचे नाव, पत्ता आणि फोन नंबर या रील ॉट्स अॅप नंबरवर पाठवून आपली नोंदणी पूर्ण करावी. प्रशिक्षणासाठी जागा मर्यादित आहेत. नोंदणी करणाऱ्यांना कार्यक्रमाविषयी अधिक तपशील वैयक्तिक कळविण्यात येईल.
नोंदणीची मुदत ४ मार्चपर्यंत आहे. अधिकाधिक महिलांनी प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवहन इन्फिगो फौंडेशनतर्फे करण्यात आले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड






