महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत ८ मेपासून लहान मुलांसाठी समर कॅम्प

रत्नागिरी : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटतर्फे उन्हाळ्याच्या सुट्टीत लहान मुलांसाठी ८ ते १३ मे या कालवधीत रत्नागिरीत समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.

बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट शिरगाव येथे असून महिलांसाठी कौशल्यावर आधारित विविध अभ्यासक्रम, प्रशिक्षण राबवत असते. या केंद्रात फूड प्रोसेसिंग, फॅशन डिझायनिंग व ब्युटी व वेलनेसवर आधारित विविध प्रशिक्षण आयोजित केले जातात.
सध्या शाळांना उन्हाळी सुट्ट्या सुरु असून याचा सुट्टीचा सदुपयोग करता यावा म्हणून बाया ऊ केंद्रातर्फे १० ते १५ वयोगटातील मुला-मुलींसाठी प्रथमच उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सुट्टीमध्ये लहान मुलांना अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विविध छंद जोपासता यावेत, विविध गोष्टींची आवड निर्माण व्हावी तसेच नवनवीन गोष्टी शिकता याव्यात, याचा विचार करून अनोख्या शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.

या शिबिरात विविध घरगुती केक आणि कुकीज बनवणे, चॉकलेट व कप केक बनवणे, आइस्क्रीम आणि मिल्क शेक बनवणे, पेपर क्राफ्ट, फॅब्रिक ज्वेलरी तयार करायला शिकणे, कपड्यावर ब्लॉकप्रिंटिंग करून विविध वस्तू बनवणे, फनी गेम्स, चित्रकला अशा विविध गोष्टी शिकायला व प्रत्यक्ष बनवायला मिळणार आहेत. बाया कर्वे कौशल्य विकास केंद्राचे तज्ज्ञ शिक्षक वर्ग या सर्व गोष्टी मुलांना शिकवणार आहेत.

हे शिबिर ८ मे ते १३ मे या कालावधीत रोज दुपारी १० ते २ या वेळात रत्नागिरी शहरापासून जवळच साखरतर रोडवर शिरगाव येथे निसर्गरम्य परिसरात असलेल्या संस्थेच्या यशोदाबाई पवार सभागृहात होणार आहे. यासाठी ६०० रुपये प्रवेश शुल्क असून नाव नोंदणी सुरू आहे. याबरोबरच मुलांसोबत येणाऱ्या पालकांना त्यांच्या वेळेचा सदुपयोग व्हावा म्हणून पूर्वनोंदणी करून काही वर्कशॉपचे आयोजन करण्यात येणार आहे.

या अनोख्या समर कॅम्पसाठी लहान मुलांनी व त्यांच्या पालकांनी 7499821369 या क्रमांकावर संपर्क साधून नावनोंदणी करावी, असे आवाहन प्रकल्प समन्वयक स्वप्नील सावंत यांनी केले आहे.

महिलांसाठी कौशल्य प्रशिक्षण

सध्या बाया कर्वे कौशल्य विकास केंद्रामार्फत महिलांसाठी उन्हाळ्यातील खास आकर्षण म्हणून आइस्क्रीम वर्कशॉप, सरबत प्रीमिक्स वर्कशॉप, फास्ट फूड वर्कशॉप, केक वर्कशॉप, बिस्कीट प्रशिक्षण, तसेच मेंदी कोर्स, सेल्फब्रुमिंग, साडी स्टिचिंग, साडी ड्रेपिंग आदी वर्कशॉप विविध बॅचनुसार लावण्यात आले आहेत. तसेच लोणचे, मसाला, विविध फळप्रक्रिया प्रशिक्षण, ड्रेस मेकिंग, ब्युटीथेरपिस्ट आणि मेकअप हेअर स्टायलिंग आदी विविध कोर्सचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी प्रवेश देणे सुरू आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड


Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply