रत्नागिरी : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कौशल्य विकास उपक्रमांतर्गत रत्नागिरीतील बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटतर्फे नवरात्रीनिमित्त तरुणी आणि महिलांसाठी दोन विशेष कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. १५ ते १९ सप्टेंबर या कालावधीत दुपारी अडीच ते सायंकाळी साडेपाच या कालावधीत एक कार्यशाळा होणार आहे. त्या कार्यशाळेत घागरा-चोली स्टायलिंग (नवीन-जुन्या साडीपासून घागरा-चोली शिवणे; हँडमेड ज्वेलरी बनवणे, गरबा मेकअप शिकणे आणि टिप्स या विषयांचा समावेश आहे. दुसरी कार्यशाळा २० सप्टेंबर रोजी दुपारी एक ते सायंकाळी पाच या वेळेत होणार आहे. ही नवरात्र उपवास स्पेशल पाककला कार्यशाळा असेल. त्यात उपवासाचे विविध नऊ पदार्थ बनवायला शिकवले जाणार आहेत. त्यात साबुदाणा ट्रँगल उपवास इडली, अकॉर्डियन फ्राइज, साबुदाणा सँडविच, उपवास पॉपकॉर्न, पोटॅटो स्किन फ्राइज आदी पदार्थांचा समावेश आहे. या कार्यशाळांसाठी अत्यल्प शुल्क आकारले जाणार असून, सहभागी होण्यासाठी कोणतीही वयोमर्यादा नाही. इच्छुक गृहिणी आणि तरुणींनी यात सहभाग घेऊन नवरात्रीचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटतर्फे करण्यात आले आहे. या कार्यशाळा संस्थेच्या मारुती मंदिर येथील कार्यालयात होणार आहेत. (संपर्क : 7499821369)
संस्थेत विविध डिप्लोमा कोर्सेसही यशस्वीरीत्या चालू आहेत. फॅशन डिझाइन, कॉस्मेटोलॉजी अँड सलून मॅनेजमेंट, फूड प्रॉडक्शन, ट्रॅव्हल टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी, तसेच इंटीरिअर डिझाइन अशा वर्षभर चालणाऱ्या कोर्सेससोबतच संस्थेत विविध कार्यशाळा आणि सेमिनार आयोजित केले जातात. मेंदी, ब्लॉक प्रिंटिंग, मुलांसाठी समर कॅम्प, पर्यटन क्षेत्रातील महिलांसाठी सेमिनार, हॉस्पिटॅलिटी कार्यशाळा, सारी ड्रेपिंग, सेल्फ ग्रूमिंग, सॅटिन वर्क, केक मेकिंग, मोदक मेकिंग, टेरारियम वर्कशॉप यांसारख्या उपक्रमांना महिला व तरुणींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. आता नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर महिला व तरुणींकरिता दोन विशेष कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

