महिलांना समान संधी हवी; त्याबरोबरच महिलांनी निर्णय घेऊन त्याची जबाबदारीही घेणे गरजेचे : चित्रा बुझरुक

रत्नागिरी : ‘महिलांच्या शाश्वत विकासासाठी शिक्षण, समानता आणि सक्षमीकरण या बाबी आवश्यक आहेत. स्त्री-पुरुष हे एकमेकांचे सहभागीदार आहेत. पुरुषांशी बरोबरी किंवा स्पर्धा न करताही महिलांना समान संधी मिळायला हवी. त्यातून लिंगसमानता प्रस्थापित होऊ शकते. महिला सक्षमीकरणातून देशाची प्रगती होणार आहे. महिलांनी शारीरिक-मानसिक आरोग्य सांभाळलेच पाहिजे. नवनवीन शिक्षण घेत राहायला हवे. स्वतः निर्णय घेऊन त्या निर्णयाची जबाबदारीही घेणे आवश्यक आहे. स्वभाव, आवड आणि बाजारातील मागणी यांचा विचार करून शिक्षण घेतल्यास यश नक्की मिळते,’ असे प्रतिपादन पुण्यातील रमा पुरुषोत्तम फाउंडेशनच्या संचालिका चित्रा बुझरुक यांनी आज (१२ सप्टेंबर) रत्नागिरीत केले. ‘महिलांच्या शाश्वत विकासासाठी शिक्षण, समानता आणि सक्षमीकरण’ या विषयावर रत्नागिरीतल्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (पीएम- उषा) योजनेअंतर्गत महाविद्यालयाने ही परिषद आयोजित केली आहे. ही परिषद ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही स्वरूपात होत आहे. या प्रसंगी मंचावर रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, बीजभाषक डॉ. लीना बावडेकर, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, पी. एम. उषा समन्वयक व शास्त्र शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी आणि महिला विकास कक्षाच्या समन्वयक डॉ. सोनाली कदम उपस्थित होत्या. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर परिषदेत सादर होणाऱ्या शोधनिबंधांच्या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य डॉ. साखळकर यांनी महाविद्यालयाच्या स्थापनेपासून आतापर्यंतचा प्रगतीचा आढावा घेतला.

बुझरुक म्हणाल्या, ‘महिलांनी शारीरिक व मानसिक आरोग्य सांभाळले पाहिजे. त्यासाठी कोणतीही सबब न सांगता चालणे, खेळ, धावणे, योगासने आवश्यक आहेत. सद्यस्थितीत तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने बदल होत असून, त्यासाठी नवनवीन शिक्षण घेत राहायला हवे, जिथे शिक्षणाची संधी मिळेल ती साधली पाहिजे. शिक्षणाने आपली निर्णयक्षमता विकसित होते. स्वतः निर्णय घेऊन त्या निर्णयाची जबाबदारी घेणेही आवश्यक असते. तुमचा स्वभाव, आवड आणि बाजारातील मागणी यांचा विचार करून शिक्षण घेतले तर नक्कीच यश मिळते.’ (उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली)

बुझरुक यांनी सांगितले, की ‘अलीकडे लग्न करताना मुलींच्या अनेक अटी असतात; पण जेव्हा तुम्ही नोकरी, व्यवसायात मोठ्या पदावर असता तेव्हा तुमच्या मुलांचा सांभाळ घरातील वडीलधारी व्यक्ती करतात. त्यामुळे कुटुंबव्यवस्था टिकली पाहिजे. आपण नातेसंबंध जपले पाहिजेत. तसेच स्वतःचे एक नेटवर्क विकसित केले पाहिजे. प्रत्येक गोष्ट आपण स्वबळावर आणि स्वकर्तृत्वावर करतो असे नसून, त्यासाठी आपल्याला अनेकांची मदत होत असते. तसेच आपण सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. अशा अनेक गोष्टीमुळे समाजात समानता अस्तित्वात येईल.

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे म्हणाल्या, ‘स्त्री सक्षमीकरण आणि सामाजिक आर्थिक-विकास या गोष्टी हातात हात घालूनच जात असतात. लिंगसमानता आपल्या घरापासूनच सुरू व्हायला हवी. रत्नागिरी जिल्ह्यात साक्षरता पूर्वीपासूनच जास्त आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून देशाला पाच भारतरत्ने मिळाली आहेत. त्यामुळे महिला सक्षमीकरणाचे चांगले काम उभे राहिले.’

महिला सरपंच असलेल्या गावांमध्ये समस्या समजून त्या सोडवण्याकडे कल दिसतो, असे निरीक्षण रानडे यांनी नोंदवले. या वेळी त्यांनी महिलांचे हक्क, अधिकार, संरक्षणाबाबत राज्यघटनेतील तरतुदींची सविस्तरपणे माहिती दिली. शासनाच्या दीनदयाळ अंत्योदय योजना, महिला बचत गटांचे सक्षमीकरण, उमेद योजनेचा फायदा झालेली काही उदाहरणेसुद्धा त्यांनी सांगितली. महिलेच्या नावावर घर, बेटी बचाव, बेटी पढाव योजना, स्वस्थ नारी, सक्षम परिवार या योजनासुद्धा महत्त्वाच्या आहेत. कामटाळूपणा ही घातक वृत्ती असून, त्यात पुरुष व स्त्रिया दोघांचाही समावेश होतो. नोकरदार महिलांना खूप आव्हाने असतात. आपल्याला अधिकार, कर्तव्याची जाणीव असली पाहिजे. एक महिला म्हणून आपल्या स्त्रीत्वाचा उपयोग आपल्या फायद्यासाठी न करणे हे तत्त्व पाळले तर समानता महिलांकडे चालत येणार, असेही रानडे म्हणाल्या.

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन म्हणाल्या, ‘भारतात सगळ्यात मोठी कुटुंबव्यवस्था आहे. तिला तडा जाऊ नये. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. शिक्षक, प्राध्यापकांनी ही गोष्ट विद्यार्थ्यांपर्यंत, पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली पाहिजे.’

प्रास्ताविक डॉ. सोनाली कदम यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. मेघना म्हाद्ये यांनी केले. मान्यवरांचा परिचय डॉ. निधी पटवर्धन यांनी करून दिला. डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी आभार मानले. परिषदेच्या समारोपाला उद्या (१३ सप्टेंबर) केंद्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर उपस्थित राहणार आहेत. दोन दिवस संशोधक महिलांचे विविध प्रश्न आणि पैलूंवर भाष्य करणाऱ्या शोधनिबंधांचे सादरीकरण करणार असून, विविध क्षेत्रांतील महिलांचे योगदान, स्त्रीशिक्षण, समानता, त्यांचे सक्षमीकरण अशा विविध विषयांवर परिषदेत विचारमंथन होणार आहे. (English translation of news is given below the slideshow.)

Women Should Have Equal Opportunities; Along with That, They Must Take Decisions and Be Responsible for Them: Chitra Buzruk

Ratnagiri: “For the sustainable development of women, education, equality, and empowerment are essential. Men and women are partners in life. Women should get equal opportunities without having to compete with men or claiming equality. Through this, gender equality can be established. The progress of the nation will come through women’s empowerment. Women must take care of their physical and mental health. They should continuously pursue new education. It is important to make decisions themselves and take responsibility for those decisions. Success is definitely achieved when education is pursued by considering one’s personality, interests, and market demand,” stated Chitra Buzruk, Director of the Rama Purushottam Foundation in Pune, today (12th September) in Ratnagiri. She was speaking at the inauguration of the two-day international conference organized by Gogate-Joglekar College in Ratnagiri on the topic “Education, Equality, and Empowerment for the Sustainable Development of Women.”

This conference was organized by the college under the Prime Minister’s Higher Education Campaign (PM-Usha) scheme. The event is being conducted in both online and offline formats. Present on the stage for the event were Mrs. Shilpatai Patwardhan, Chairperson of Ratnagiri Education Society; Vaidehi Ranade, Chief Executive Officer of the District Council; Dr. Leena Bavdekar, keynote speaker; Principal Dr. Makrand Sakhlakar; Dr. Aparna Kulkarni, PM-Usha Coordinator and Vice-Principal of the Science Department; and Dr. Sonali Kadam, Coordinator of the Women’s Development Cell. The program began with a lamp lighting ceremony. Following that, the dignitaries released the book of research papers to be presented during the conference. At the beginning of the program, Principal Dr. Sakhlakar provided an overview of the college’s progress since its establishment.

Buzruk stated, “Women must take care of their physical and mental health. Walking, playing, running, and doing yoga are essential without any excuse. Currently, rapid changes are happening in the field of technology, and therefore, women must continuously pursue new education and grab any available opportunity. Education develops our decision-making ability. It is necessary to take decisions independently and also be responsible for those decisions. If education is pursued considering one’s temperament, interests, and market demand, success is definitely achievable.”

Buzruk also said, “Nowadays, while getting married, many conditions are imposed by girls. However, when women hold high positions in jobs or business, it is often the family’s elder male member who looks after the children. Therefore, the family system must be sustained. We should nurture relationships. Likewise, one should develop one’s own network. We do not do everything solely by our own power and ability; many people’s support plays a part. We should also uphold social responsibility. Due to such many factors, equality will emerge in society.”

Vaidehi Ranade, Chief Executive Officer of Ratnagiri District Council, said, “Women’s empowerment and socio-economic development go hand in hand. Gender equality should begin right from our homes. Literacy in Ratnagiri has been higher since earlier times. From Ratnagiri district, five Bharat Ratnas have been awarded to the country. Therefore, good work in the area of women’s empowerment has been established.”

Ranade also observed that in villages where women are elected as Sarpanch (village heads), there is a tendency to understand and resolve problems effectively. During the event, she explained in detail the constitutional provisions regarding women’s rights, entitlements, and protection. She shared examples of how the government’s Deendayal Antyodaya Yojana, women’s self-help group empowerment, and the UMED scheme have benefited women. Important schemes such as House in a Woman’s Name, Beti Bachao Beti Padhao (Save Daughter, Educate Daughter), Swastha Nari (Healthy Woman), and Saksham Parivar (Empowered Family) were also mentioned. She emphasized that laziness is a dangerous habit and both men and women are involved in it. Working women face many challenges. We must be aware of our rights and duties. If women follow the principle of not using their femininity for selfish gains, equality will naturally come to them,” said Ranade.

Shilpatai Patwardhan, Chairperson of Ratnagiri Education Society, said, “India has the largest family system. It should not be broken. Freedom does not mean lawlessness. Teachers and professors should convey this message to students and future generations.”

The welcome address was delivered by Dr. Sonali Kadam, and the program was conducted by Dr. Meghna Mhadye. The introduction of dignitaries was presented by Dr. Nidhi Patwardhan. Dr. Aparna Kulkarni gave the vote of thanks. The conference will conclude tomorrow (13th September), with the presence of the Chairperson of the National Commission for Women, Mrs. Vijaya Rahatkar. Over two days, various research papers by women researchers will be presented, offering commentary on diverse questions and aspects. The conference will foster discussions on contributions of women in various fields, women’s education, equality, and their empowerment.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply