ह्युमन पॅपिलोमा व्हायरस अर्थात एचपीव्ही प्रतिबंधक लसीकरणाचा आज रत्नागिरीत प्रारंभ झाला. हे लसीकरण करणारा रत्नागिरी हा राज्यातला पहिला जिल्हा आहे, असं जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी या वेळी सांगितलं.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
ह्युमन पॅपिलोमा व्हायरस अर्थात एचपीव्ही प्रतिबंधक लसीकरणाचा आज रत्नागिरीत प्रारंभ झाला. हे लसीकरण करणारा रत्नागिरी हा राज्यातला पहिला जिल्हा आहे, असं जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी या वेळी सांगितलं.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान, महसूल सेवा पंधरवडा आणि ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानाचं उद्घाटन आज पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते झालं.
रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाने आयोजित केलेल्या ‘महिलांच्या शाश्वत विकासासाठी शिक्षण, समानता आणि सक्षमीकरण’ या विषयावरच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचा आज (१३ सप्टेंबर) सायंकाळी समारोप झाला.
‘महिलांच्या शाश्वत विकासासाठी शिक्षण, समानता आणि सक्षमीकरण’ या विषयावर रत्नागिरीतल्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन आज झाले.
‘आपल्या गावातल्या मुलांना रोजगार देणारी कंपनी येत असेल, तर त्याच्या विरोधामध्येदेखील ग्रामसभा होते. हे जगामध्ये कुठे घडत असेल तर ते फक्त आपल्याकडे घडते. ग्रामसभा विधायक गोष्टींसाठी झाल्या पाहिजेत. स्वच्छतेसाठी झाल्या पाहिजेत. प्रकल्प असण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला पाहिजे. सरपंच हा गावाचा मुख्यमंत्री असतो. सरपंचांनी आपली ताकद विधायकदृष्ट्या वापरून, अख्ख्या गावाला घेऊन काम केले, तर सगळी बक्षिसे आपण मिळवू शकतो,’ असे प्रतिपादन रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.