स्त्रियांनी बदलत्या काळानुरूप आपली मानसिकता बदलावी आणि सामाजिक भान जपावे : डॉ. योगिनी घारे

रत्नागिरी : ‘शिक्षण, समता आणि सबलीकरण हे केवळ स्त्रियांसाठीच नव्हे, तर सर्वांसाठी उपयुक्त आहे. समाजात स्त्रियांना अनेक ठिकाणी संघर्ष करावा लागला असून, स्वातंत्र्य-समतेची बंद असलेली कवाडे खुली करून देण्यात समाजसुधारकांचे योगदान मोठे आहे. विकास प्रक्रियेतून स्त्रियांना वगळणे म्हणजे त्या प्रक्रियेला खीळ घालण्यासारखे असून, शाश्वत विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. स्त्रियांनी बदलत्या काळानुरूप आपली मानसिकता बदलावी आणि सामाजिक भान जपावे,’ असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाच्या उपकुलसचिव डॉ. योगिनी घारे यांनी केले. रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाने आयोजित केलेल्या ‘महिलांच्या शाश्वत विकासासाठी शिक्षण, समानता आणि सक्षमीकरण’ या विषयावरच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आज (१३ सप्टेंबर) सायंकाळी झालेल्या समारोप कार्यक्रमात त्या ऑनलाइन माध्यमातून बोलत होत्या. केंद्र सरकारच्या उच्च शिक्षण विभागाच्या प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (पीएम- उषा) योजनेअंतर्गत प्राप्त अनुदानातून महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षाने ही दोन दिवसांची परिषद ऑनलाइन आणि ऑफलाइन माध्यमातून आयोजित केली होती.

समाजातील पीडित महिलांच्या मदतीसाठी महिला कक्ष तयार केला जाणार असल्याचे रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन यांनी या वेळी सांगितले. त्या म्हणाल्या, ‘महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिलांनी पुढे आले पाहिजे. समाजातला बंधुवर्गही मदतीला असतो. परिषदेमध्ये विविध महिलांच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली. त्यानुसार आता समाजातील समस्याग्रस्त, पीडित महिलांच्या मदतीसाठी महिला कक्ष तयार करू या. त्याकरिता महिला प्राध्यापकांनी वेळ द्यावा. यातून चाकोरीबाहेरचे काम करता येईल. खांद्याला खांदा लावून काम केले तर काही अवघड नाही. हीच या परिषदेची फलश्रुती असेल.’ (उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली)

या वेळी मंचावर स्त्री प्रश्न, स्त्रीवादाच्या अभ्यासक आणि चळवळीतील कार्यकर्त्या आणि दिलासा संस्थेच्या प्रमुख प्रा. डॉ. रूपा शहा, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, पीएम-उषा महाविद्यालयीन समन्वयक व शास्त्र शाखा उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, उपप्राचार्या प्रा. डॉ. कल्पना आठल्ये व प्रा. डॉ. सीमा कदम, महिला विकास कक्ष आणि परिषदेच्या समन्वयक डॉ. सोनाली कदम, आयोजन सचिव प्रा. अश्विनी देवस्थळी, डॉ. यास्मिन आवटे उपस्थित होत्या. सहभागी महिलांनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त करून अशा परिषदा वारंवार व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली. यातून बरेच शिकायला मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.

प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये नारीशक्तीचा सन्मान केला. महाविद्यालयात सर्वाधिक विद्यार्थिनी असून, महिला प्राध्यापकही जास्त असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. तसेच तिन्ही शाखांच्या उपप्राचार्यपदी महिला विराजमान असून, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीत महिला-पुरुष भेद नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

या वेळी प्रातिनिधिक सहभागींना प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच चर्चासत्राच्या प्रमुख डॉ. यास्मिन आवटे यांचा सत्कार करण्यात आला. महिला शक्ती म्हणून शिल्पाताई पटवर्धन यांनाही शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. मेघना म्हाद्ये यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अश्विनी देवस्थळी यांनी आभार मानले.

Women Should Change Their Mindset According to Changing Times and Preserve Social Awareness: Dr. Yogini Ghare

Ratnagiri: “Education, equality, and empowerment are not only useful for women but for everyone. Women have had to face struggles in many areas of society, and the contribution of social reformers has been significant in opening the locked doors of freedom and equality. Excluding women from the development process is akin to putting a wedge in it, as sustainable development is a continuous process. Women must change their mindset in accordance with the changing times and maintain social awareness,” stated Dr. Yogini Ghare, Deputy Registrar of Mumbai University. She was speaking online during the concluding ceremony of the international conference organized by Gogate-Joglekar College, Ratnagiri, on the topic “Education, Equality, and Empowerment for the Sustainable Development of Women,” held today (13th September) in the evening. This two-day conference was organized by the college’s Women’s Development Cell under the Prime Minister’s Higher Education Campaign (PM-Usha) scheme, supported by a grant from the central government’s Department of Higher Education, and was conducted through both online and offline modes.

During the event, Shilpatai Patwardhan, Chairperson of Ratnagiri Education Society, announced that a Women’s Cell will be created to help the oppressed women in society. She said, “For women’s empowerment, women themselves need to come forward. The extended family is also there to help. Various questions of women were discussed during the conference. Based on that, let us now create a Women’s Cell to help the distressed and oppressed women in society. Female professors should dedicate their time for this purpose. Through this, work outside the typical framework can be done. Nothing is difficult when we work shoulder to shoulder. This will be the real outcome of the conference.”

On this occasion, on stage were experts and activists in women’s issues and feminism, as well as the head of Dilasa Organization, Prof. Dr. Rupa Shaha; Principal Dr. Makrand Sakhlakar; PM-Usha College Coordinator and Vice-Principal of Science Faculty Dr. Aparna Kulkarni; Vice-Principals Prof. Dr. Kalpana Athlye and Prof. Dr. Seema Kadam; Women’s Development Cell and Conference Coordinator Dr. Sonali Kadam; Organizing Secretary Prof. Ashwini Devsthali; and Dr. Yasmin Awate. Participating women expressed their representative opinions and expressed hope that such conferences should be organized regularly. They also mentioned that they learned a lot from this experience.

In her presidential address, Principal Dr. Makrand Sakhalakar honored women’s power. He emphasized that the majority of students at the college are female, and there are more female professors as well. Furthermore, all three departments have women as vice-principals, and there is no gender distinction in the Ratnagiri Education Society.

During the event, representative participants were awarded certificates. The chief of the discussion session, Dr. Yasmin Awate, was felicitated. Shilpatai Patwardhan was also honored as a symbol of women’s power, with a shawl, a coconut, a bouquet of flowers, and gifts. Dr. Meghna Mhade conducted the proceedings, and Prof. Ashwini Devsthali gave the vote of thanks.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply