रत्नागिरी जिल्ह्यातून सर्वाधिक ऑलिव्ह रिडले कासवाची पिल्ले समुद्रात

रत्नागिरी : ऑलिव्ह रिडले समुद्र कासव संवर्धन मोहिमेत रत्नागिरी जिल्ह्यातून राज्यातील सर्वाधिक पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. राज्यातील ५६ समुद्रकिनाऱ्यांवरून १ लाख ८६ हजार ५९६ पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वाधिक ५४ हजार २७७ पिल्लांचा समावेश आहे.

त्रिंबकच्या वक्तृत्व स्पर्धेत रसिका तेंडोलकर प्रथम

मालवण : त्रिंबक (ता. मालवण) येथील कै. गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत रसिका तेंडोलकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

उज्ज्वला धानजी यांनी लिहिलेल्या आठवणीच्या हिंदोळ्यावर पुस्तकाचे प्रकाशन

कणकवली : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कणकवली येथील सेवानिवृत्त रोखपाल आणि कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवण यांच्या आजीव सदस्या उज्ज्वला चंद्रशेखर धानजी यांच्या “आठवणींच्या हिंदोळ्यावर” या पुस्तकाचे प्रकाशन कणकवलीत नीलम कंट्रीसाइड येथे झाले.

कोकणाच्या शाश्वत विकासावरील परिसंवादाला उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी : आयआयए संस्थेने कोकणाच्या शाश्वत विकासावर आयोजित केलेल्या मंथन परिसंवादाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

साने गुरुजींच्या सहवासामुळे साहित्याची बीजे रोवली गेली – मधु मंगेश कर्णिक

रत्नागिरी : लहानपणी शाळेत असताना साने गुरुजींच्या अगदी अल्पशा सहवासामुळे माझ्यात साहित्याची बीजे रोवली गेली, असे पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी सांगितले.

मराठीचे ऑनलाइन शिक्षण देण्याचा निर्णय– उदय सामंत

रत्नागिरी : परदेशातील मराठी मुलांना ऑनलाइन मराठी भाषेचे शिक्षण देण्याचा उपक्रम पुढच्या वर्षापासून सुरू केला जाईल, अशी ग्वाही उद्योग व मराठी भाषा तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.