कोमसाप आणि केशवसुत स्मारक ही माझी दोन पुस्तके अमर : मधु मंगेश कर्णिक

रत्नागिरी : माझ्या पुस्तकांवर वाचकांनी भरभरून प्रेम केले. मात्र कोकण मराठी साहित्य परिषद आणि मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक ही माझी दोन पुस्तके अमर आहेत. वाचकांनी यापुढे ती सांभाळावीत, असे भावनिक आवाहन पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी केले.

त्रिंबक वाचनालयातर्फे सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

मालवण : त्रिंबक (ता. मालवण) येथील वाचन कलाविकास समिती त्रिंबक संचालित कै. गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालयाने दादा ठाकूर (आचरे- पारवाडी) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय खुल्या (प्रौढ गट) वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे.

कोकणातील पारंपरिक तारपा लोककलेचा वारसा जपणारे आदिवासी भिकल्या धिंडा यांना पद्मश्री

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज केंद्र सरकारकडून प्रतिष्ठेच्या पद्म पुरस्कारांची घोषणा झाली. त्यात महाराष्ट्रातून ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना (मरणोत्तर) पद्मविभूषण, तीन जणांना पद्मभूषण आणि ११ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. तारपावादनाची पारंपरिक लोककला जपणारे पालघरमधील आदिवासी भिकल्या धिंडा यांचा पद्मश्री पुरस्कारविजेत्यांमध्ये समावेश आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी धिंडा यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.

भारतात समान नागरी कायदा हवा – चारुदत्तबुवा आफळे

रत्नागिरी : भारतात सर्वांना समान न्याय देण्यासाठी समान नागरी कायदा हवा, असे आग्रही प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार विद्यावाचस्पती हभप चारुदत्तबुवा आफळे यांनी केले.

जगभरात पंधरा टक्के असलेल्या हिंदूंनी संघटित होण्याची गरज – चारुदत्तबुवा आफळे

रत्नागिरी : जगभरात संख्येने केवळ पंधरा टक्के असलेल्या हिंदूंनी आपल्या आणि आपल्या धर्माच्या अस्तित्वासाठी संघटित होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तबुवा आफळे यांनी येथे केले.

राज्यघटनेतील तिसाव्या कलमामुळे हिंदूंची कोंडी – आफळेबुवा

रत्नागिरी : भारतीय राज्यघटनेतील तिसावे कलम हिंदूंसाठी अत्यंत हानिकारक आहे. त्यामुळे देशात बहुसंख्येने असलेल्या हिंदूंची कोंडी होते, असे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्त बुवा आफळे यांनी केले.