पालघर/मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज केंद्र सरकारकडून प्रतिष्ठेच्या पद्म पुरस्कारांची घोषणा झाली. त्यात महाराष्ट्रातून ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना (मरणोत्तर) पद्मविभूषण, तीन जणांना पद्मभूषण आणि ११ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. तारपावादनाची पारंपरिक लोककला जपणारे पालघरमधील आदिवासी भिकल्या धिंडा यांचा पद्मश्री पुरस्कारविजेत्यांमध्ये समावेश आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी धिंडा यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.
भिकल्या धिंडा यांचे वय नव्वदीच्या घरात असून, ते पालघरच्या जव्हार तालुक्यातील वाळवंडे या दुर्गम आदिवासी भागात आपल्या कुटुंबासोबत राहतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी तारपा वादनाची परंपरा अखंड ठेवली आहे. आपले आयुष्यच त्यांनी या लोककलेचा प्रचार करण्यासाठी वेचले आहे. भिकल्या धिंडा यांची तारपावादनाची परंपरा त्यांच्या कुटुंबात सुमारे १५० वर्षांपासून चालत आलेली आहे. आजोबा आणि वडिलांच्या मार्गदर्शनाखाली लहानपणापासूनच त्यांनी ही कला आत्मसात केली आणि ती पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी आपले वाद्य स्वतः बनवले आहे आणि त्यांच्या संग्रहात दहाहून अधिक तारपा वाद्ये आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ते तारपा वाद्याचे वादन करून रसिकांची मने जिंकतात; मात्र तरुण पिढीत या पारंपरिक कलेबद्दल रस कमी असल्याची त्यांनी खंत व्यक्त केली आहे. तारपा हेच आपले दैवत असल्याची भावना व्यक्त करून, धिंडा यांनी पद्म पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त केला आहे. (सर्व पुरस्कारार्थांची यादी जाहिरातीच्या खाली)
महाराष्ट्रातील पुरस्कारप्राप्त मान्यवर
पद्मविभूषण – अभिनेते धर्मेंद्र (मरणोत्तर) (कला)
पद्मभूषण
– गायिका अलका याज्ञिक (कला),
– पीयूष पांडे (मरणोत्तर) (कला),
– उदय कोटक (व्यापार व उद्योग)
पद्मश्री
क्रिकेटपटू रोहित शर्मा (क्रीडा)
अभिनेता आर. माधवन (कला)
अभिनेते सतीश शहा (मरणोत्तर) (कला)
भिकल्या धिंडा (कला)
श्रीरंग देवबा लाड (कृषी)
अशोक खडे (व्यापार व उद्योग)
जनार्दन बापूराव बोथे (समाजकार्य)
रघुवीर तुकाराम खेडकर (कला)
जुजर वासी (विज्ञान व अभियांत्रिकी)
आर्मिडा फर्नांडिस (वैद्यक)
सत्यानारायण नुवाल (व्यापार व उद्योग),
🏅 पद्म पुरस्कार २०२६ – संपूर्ण यादी
🔶 पद्मविभूषण (५)
धर्मेंद्र सिंह देओल (मरणोत्तर) – कला – महाराष्ट्र
के. टी. थॉमस – सार्वजनिक जीवन – केरळ
एन. राजम – कला – उत्तर प्रदेश
पी. नारायणन – साहित्य व शिक्षण – केरळ
व्ही. एस. अच्युतानंदन (मरणोत्तर) – सार्वजनिक जीवन – केरळ
🔶 पद्मभूषण (१३)
अलका याज्ञिक – कला – महाराष्ट्र
भगतसिंह कोश्यारी – सार्वजनिक जीवन – उत्तराखंड
कल्लिपट्टी रामासामी पलानीस्वामी – वैद्यक – तमिळनाडू
मामुटी – कला – केरळ
डॉ. नोरी दत्तात्रेयुडू – वैद्यक – अमेरिका
पीयूष पांडे (मरणोत्तर) – कला – महाराष्ट्र
एस. के. एम. मयिलानंदन – समाजकार्य – तमिळनाडू
शतावधानी आर. गणेश – कला – कर्नाटक
शिबू सोरेन (मरणोत्तर) – सार्वजनिक जीवन – झारखंड
उदय कोटक – व्यापार व उद्योग – महाराष्ट्र
व्ही. के. मल्होत्रा (मरणोत्तर) – सार्वजनिक जीवन – दिल्ली
वेल्लापल्ली नटेशन – सार्वजनिक जीवन – केरळ
विजय अमृतराज – क्रीडा – अमेरिका
पद्मश्री (११३)
ए. ई. मुथुनायगम – विज्ञान व अभियांत्रिकी – केरळ
अनिल कुमार रस्तोगी – कला – उत्तर प्रदेश
अंके गौडा – समाजकार्य – कर्नाटक
आर्मिडा फर्नांडिस – वैद्यक – महाराष्ट्र
अरविंद वैद्य – कला – गुजरात
अशोक खडे – व्यापार व उद्योग – महाराष्ट्र
अशोक कुमार सिंह – विज्ञान – उत्तर प्रदेश
अशोक कुमार हालदार – साहित्य – पश्चिम बंगाल
बलदेव सिंह – क्रीडा – पंजाब
भगवानदास रायकर – क्रीडा – मध्य प्रदेश
भरतसिंह भारती – कला – बिहार
भिकल्या धिंडा – कला – महाराष्ट्र
विश्वबंधू (मरणोत्तर) – कला – बिहार
ब्रिजलाल भट्ट – समाजकार्य – जम्मू-काश्मीर
बुद्ध रश्मी मणी – पुरातत्त्व – उत्तर प्रदेश
बुधरी ताती – समाजकार्य – छत्तीसगड
चंद्रमौली गड्डामनुगु – विज्ञान – तेलंगणा
चंद्रमौली गड्डामनुगु – विज्ञान व अभियांत्रिकी – तेलंगणा
चरण हेंब्रम – साहित्य व शिक्षण – ओडिशा
चिरंजी लाल यादव – कला – उत्तर प्रदेश
दीपिका रेड्डी – कला – तेलंगणा
धार्मिकलाल चुनिलाल पंड्या – कला – गुजरात
गड्डे बाबू राजेंद्र प्रसाद – कला – आंध्र प्रदेश
गफरुद्दीन मेवाती जोगी – कला – राजस्थान
गंबीर सिंग योंझोन – साहित्य व शिक्षण – पश्चिम बंगाल
गरिमेल्ला बालकृष्ण प्रसाद (मरणोत्तर – कला – आंध्र प्रदेश
गायत्री बालसुब्रमण्यम व रंजनी बालसुब्रमण्यम (द्वयी – कला – तमिळनाडू
गोपालजी त्रिवेदी – विज्ञान व अभियांत्रिकी – बिहार
गुडूरू वेंकट राव – वैद्यक – तेलंगणा
एच. व्ही. हांडे – वैद्यक – तमिळनाडू
हॅली वार – समाजकार्य – मेघालय
हरि माधव मुखोपाध्याय (मरणोत्तर – कला – पश्चिम बंगाल
हरिचरण सैकिया – कला – आसाम
हरमनप्रीत कौर भुल्लर – क्रीडा – पंजाब
इंदरजित सिंग सिधू – समाजकार्य – चंदीगड
जनार्दन बापुराव बोथे – समाजकार्य – महाराष्ट्र
जोगेश देउरी – कृषी – आसाम
जुजर वासी – विज्ञान व अभियांत्रिकी – महाराष्ट्र
ज्योतिष देबनाथ – कला – पश्चिम बंगाल
के. पाजनिवेल – क्रीडा – पुदुच्चेरी
के. रामासामी – विज्ञान व अभियांत्रिकी – तमिळनाडू
के. विजयकुमार – नागरी सेवा – तमिळनाडू
कबिंद्र पुरकायस्थ (मरणोत्तर – सार्वजनिक जीवन – आसाम
कैलाशचंद्र पंत – साहित्य व शिक्षण – मध्य प्रदेश
कलामंडलम विमला मेनन – कला – केरळ
केवलकृष्ण ठाकराल – वैद्यक – उत्तर प्रदेश
खेमराज सुंदरियाल – कला – हरियाणा
कोल्लकल देवकी अम्मा – समाजकार्य – केरळ
कृष्णमूर्ती बालसुब्रमण्यम – विज्ञान व अभियांत्रिकी – तेलंगणा
कुमार बोस – कला – पश्चिम बंगाल
कुमारसामी थंगराज – विज्ञान व अभियांत्रिकी – तेलंगणा
प्रो. लार्स–क्रिश्चियन कोख – कला – जर्मनी
ल्यूदमिला खोखलोव्हा – साहित्य व शिक्षण – रशिया
माधवन रंगनाथन – कला – महाराष्ट्र
मगंती मुरली मोहन – कला – आंध्र प्रदेश
महेंद्र कुमार मिश्रा – साहित्य व शिक्षण – ओडिशा
महेंद्रनाथ रॉय – साहित्य व शिक्षण – पश्चिम बंगाल
मामिदाला जगदीश कुमार – साहित्य व शिक्षण – दिल्ली
मंगला कपूर – साहित्य व शिक्षण – उत्तर प्रदेश
मीर हाजीभाई कासमभाई – कला – गुजरात
मोहन नगर – समाजकार्य – मध्य प्रदेश
नारायण व्यास – पुरातत्त्व – मध्य प्रदेश
नरेशचंद्र देव वर्मा – साहित्य व शिक्षण – त्रिपुरा
निलेश मांडलेवाला – समाजकार्य – गुजरात
नुरुद्दीन अहमद – कला – आसाम
ओथुवार तिरुत्तणी स्वामिनाथन – कला – तमिळनाडू
डॉ. पद्मा गुरमेट – वैद्यक – लडाख
पालकोंडा विजय आनंद रेड्डी – वैद्यक – तेलंगणा
पोखिला लेकथेपी – कला – आसाम
डॉ. प्रभाकर कोरे – साहित्य व शिक्षण – कर्नाटक
प्रतीक शर्मा – वैद्यक – अमेरिका
प्रविण कुमार – क्रीडा – उत्तर प्रदेश
प्रेमलाल गौतम – विज्ञान व अभियांत्रिकी – हिमाचल प्रदेश
प्रसेनजित चॅटर्जी – कला – पश्चिम बंगाल
डॉ. पुण्ण्यमूर्ती नटेशन – वैद्यक – तमिळनाडू
आर. कृष्णन (मरणोत्तर – कला – तमिळनाडू
आर. व्ही. एस. मणी – नागरी सेवा – दिल्ली
रबीलाल तुडू – साहित्य व शिक्षण – पश्चिम बंगाल
रघुपत सिंग (मरणोत्तर – कृषी – उत्तर प्रदेश
रघुवीर तुकाराम खेडकर – कला – महाराष्ट्र
राजस्थपती कळिअप्पा गौंडर – कला – तमिळनाडू
राजेंद्र प्रसाद – वैद्यक – उत्तर प्रदेश
राम रेड्डी मामिडी (मरणोत्तर – पशुपालन – तेलंगणा
राममूर्ती श्रीधर – रेडिओ प्रसारण – दिल्ली
रामचंद्र गोडबोले व सुनीता गोडबोले (द्वयी – वैद्यक – छत्तीसगड
रतिलाल बोरीसागर – साहित्य व शिक्षण – गुजरात
रोहित शर्मा – क्रीडा – महाराष्ट्र
एस. जी. सुशीलम्मा – समाजकार्य – कर्नाटक
संग्युसांग पोंगेनर – कला – नागालँड
संत निरंजन दास – अध्यात्म – पंजाब
सरत कुमार पात्र – कला – ओडिशा
सरोज मंडल – वैद्यक – पश्चिम बंगाल
सतीश शहा (मरणोत्तर – कला – महाराष्ट्र
सत्यानारायण नुवाल – व्यापार व उद्योग – महाराष्ट्र
सविता पुनिया – क्रीडा – हरियाणा
प्रा. शफी शौक – साहित्य व शिक्षण – जम्मू–काश्मीर
शशीशेखर वेमपती – साहित्य व शिक्षण – कर्नाटक
श्रीरंग देवबा लाड – कृषी – महाराष्ट्र
शुभा वेंकटेश अय्यंगार – विज्ञान व अभियांत्रिकी – कर्नाटक
श्याम सुंदर – वैद्यक – उत्तर प्रदेश
सिमांचल पात्रो – कला – ओडिशा
शिवशंकरी – साहित्य व शिक्षण – तमिळनाडू
डॉ. सुरेश हनगवाडी – वैद्यक – कर्नाटक
स्वामी ब्रह्मदेवजी महाराज – समाजकार्य – राजस्थान
टी. टी. जगन्नाथन (मरणोत्तर – व्यापार व उद्योग – कर्नाटक
तगा राम भील – कला – राजस्थान
तरुण भट्टाचार्य – कला – पश्चिम बंगाल
तेची गुबिन – समाजकार्य – अरुणाचल प्रदेश
तिरुवारूर भक्तवत्सलम – कला – तमिळनाडू
त्रिप्ती मुखर्जी – कला – पश्चिम बंगाल
वीझिनाथन कामकोटी – विज्ञान व अभियांत्रिकी – तमिळनाडू
वेंपटी कुटुंबा शास्त्री – साहित्य व शिक्षण – आंध्र प्रदेश
व्लादिमेर मेस्त्विरीश्विली (मरणोत्तर – क्रीडा – जॉर्जिया
युमनाम जत्रा सिंग (मरणोत्तर – कला – मणिपूर

