रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१८ जानेवारी) करोनाचे नवे ११ रुग्ण आढळले, तर १६ जण करोनामुक्त झाले.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१८ जानेवारी) करोनाचे नवे ११ रुग्ण आढळले, तर १६ जण करोनामुक्त झाले.
कणकवली : स्वातंत्र्यसैनिक गुरुवर्य वीर शंकरराव गं. पेंढारकर यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातर्फे येत्या २२ जानेवारीला राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
खासकरून लहान मुलींना सहज समजेल आणि त्यांच्याकडून पुढच्या पिढीवर चांगले संस्कार होतील, या हेतूने दत्तात्रेय अनंत आपटे उर्फ अनंततनय यांनी १९१७मध्ये सुलभ मराठीत झोंपाळ्यावरची गीता लिहिली. रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी या गीतेचा इंग्रजी अनुवाद केला आहे. गीता जयंतीपासून झोंपाळ्यावरची गीता आणि तिचा अनुवाद, तसेच मूळ संस्कृत भगवद्गीतेतील काही श्लोक येथे दररोज क्रमशः प्रसिद्ध केले जात आहेत.
रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१७ जानेवारी) करोनाचे नवे ७ रुग्ण आढळले, तर दोघे करोनामुक्त झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज २१ नवे रुग्ण आढळले, तर १२ रुग्ण करोनामुक्त झाले. दोन्ही जिल्ह्यांत मृत्यूची नोंद आज झालेली नाही.
वेंगुर्ले : लोकनेते नाथ पै यांचे संपूर्ण जीवन दीपस्तंभाप्रमाणे असून त्यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून त्यांच्या नावे वेंगुर्ले येथे ५० लाख रुपये खर्च करून एक संकुल उभारण्यात येणार आहे.
रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राला थोर चरित्रकार पद्मभूषण डॉ. धनंजय कीर यांचे नाव द्यावे, अशी मागणी अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाने केली आहे.