कोकणातील पारंपरिक तारपा लोककलेचा वारसा जपणारे आदिवासी भिकल्या धिंडा यांना पद्मश्री

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज केंद्र सरकारकडून प्रतिष्ठेच्या पद्म पुरस्कारांची घोषणा झाली. त्यात महाराष्ट्रातून ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना (मरणोत्तर) पद्मविभूषण, तीन जणांना पद्मभूषण आणि ११ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. तारपावादनाची पारंपरिक लोककला जपणारे पालघरमधील आदिवासी भिकल्या धिंडा यांचा पद्मश्री पुरस्कारविजेत्यांमध्ये समावेश आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी धिंडा यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे महाराष्ट्रभूषण शिल्पकार राम सुतार कालवश!

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचे आज (१८ डिसेंबर २०२५) नोएडा येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. ते १०० वर्षांचे होते. गुजरातमधील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ या जगातील सर्वांत उंच पुतळ्यासह अनेक महापुरुषांचे पुतळे त्यांनी साकारले होते.

लोकमान्यांच्या काही आठवणी…!

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी. त्या निमित्ताने, त्यांच्या समकालीन व्यक्तींनी सांगितलेल्या त्यांच्याबद्दलच्या काही आठवणी येथे प्रकाशित करत आहोत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंचा अंदाज त्यावरून येऊ शकेल.

राजाभाऊ लिमये यांचे नव्वदीत पदार्पण

रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष वसंत विष्णू तथा राजाभाऊ लिमये यांचा २१ जुलै रोजी वाढदिवस. नव्वदाव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाने व्यक्त केलेले मनोगत.

टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती, लोकमान्यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचे निधन

टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती, दैनिक केसरीचे विश्वस्त संपादक आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे पणतू डॉ. दीपक जयंत टिळक यांचे आज (१६ जुलै २०२५) पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले.

अरण्यऋषींची चिरसमाधी! मारुती चितमपल्ली यांचे निधन

संपूर्ण आयुष्य निसर्गाला वाहून घेतल्यामुळे अरण्यऋषी अशी ओळख प्राप्त झालेले मारुती चितमपल्ली यांनी आज (१८ जून २०२५) सोलापुरात राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.