रत्नागिरीत १६ ऑगस्टला ‘स्वरभास्कर’ बैठकीत चैतन्य, विशारद आणि नूपुर यांची मैफील

रत्नागिरी : भारतीय शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा जपणे व उमद्या शास्त्रीय गायकांसाठी व्यासपीठ निर्माण करणे या उद्देशाने आर्ट सर्कल फाउंडेशन आणि सेंटर फॉर रिसर्च अँड प्रमोशन ऑफ इंडियन म्युझिक (CRPIM) यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत येत्या १६ ऑगस्ट रोजी विशेष स्वरभास्कर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

कातळशिल्पांचे पूर्ण संरक्षण करूनच विकास प्रकल्पांचा विचार : आशिष शेलार

मानवी उत्क्रांतीच्या इतिहासाचे महत्त्वाचे पुरावे असलेल्या कोकणातील कातळशिल्पांचे पूर्ण संरक्षण करूनच भविष्यातील या भागातील विकास प्रकल्पांचे नियोजन करण्यात येईल, अशी ग्वाही सांस्कृतिक कार्यमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी आज (७ जुलै) विधानसभेत दिली.

कोकणातील पारंपरिक तारपा लोककलेचा वारसा जपणारे आदिवासी भिकल्या धिंडा यांना पद्मश्री

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज केंद्र सरकारकडून प्रतिष्ठेच्या पद्म पुरस्कारांची घोषणा झाली. त्यात महाराष्ट्रातून ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना (मरणोत्तर) पद्मविभूषण, तीन जणांना पद्मभूषण आणि ११ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. तारपावादनाची पारंपरिक लोककला जपणारे पालघरमधील आदिवासी भिकल्या धिंडा यांचा पद्मश्री पुरस्कारविजेत्यांमध्ये समावेश आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी धिंडा यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.

गौरवशाली मुंबई महापालिकेची वास्तू झाली १३३ वर्षांची!

मुंबई महापालिकेच्या वास्तूला ३१ जुलै २०२५ रोजी तब्बल १३३ वर्षे पूर्ण झाली. ही इमारत वास्तु-कलासौंदर्याचा उत्तम नमुना तर आहेच; पण तिची मजबुती किती आहे, हेही आपण अनुभवतो आहोत. इमारतीचा आराखडा ब्रिटिश आर्किटेक्टने तयार केला असला, तरी इमारतीचे बांधकाम तेलुगू कंत्राटदारांनी कोणतेही लौकिक प्रशिक्षण न घेताही वेळेत आणि कमी खर्चात केले होते. मुंबईचे शिल्पकार अशी ओळख असलेले जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेट यांचा ३१ जुलै हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, मुंबईतील ज्येष्ठ वास्तुविशारद चंद्रशेखर बुरांडे यांनी लिहिलेला मुंबई महापालिकेच्या वास्तूची वैशिष्ट्ये सांगणारा लेख प्रसिद्ध करत आहोत.

बालरंगभूमीतर्फे”इतिहास महाराष्ट्राचा” स्पर्धेचे आयोजन

रत्नागिरी : बालरंगभूमी परिषदेतर्फे इतिहास महाराष्ट्राचा ही अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

मिलिंद टिकेकर यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त रत्नागिरीत ‘नाट्यलावण्य’

रत्नागिरीतील प्रसिद्ध तबलावादक आणि विद्यार्थिप्रिय शिक्षक दिवंगत मिलिंद टिकेकर यांच्या चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त मधुमिलिंद प्रतिष्ठानतर्फे ‘नाट्यलावण्य’ या संगीत नाटकांतील लावण्यांच्या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.