रत्नागिरीच्या 'आयटीआय'मधील अथर्व नागवेकर, श्रावणी चव्हाण राज्यात आणि देशात प्रथम

रत्नागिरीच्या ‘आयटीआय’मधील अथर्व नागवेकर, श्रावणी चव्हाण राज्यात आणि देशात प्रथम

रत्नागिरी : रत्नागिरीतील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील अथर्व नागवेकर आणि श्रावणी चव्हाण यांनी आपापल्या व्यवसाय अभ्यासक्रमांमध्ये राज्यात आणि देशातही प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या या यशामुळे रत्नागिरीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा देशपातळीवर नावलौकिक झाला आहे.

रत्नागिरीतील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थी अथर्व नागवेकर याने ‘कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट’ (कोपा) या व्यवसाय अभ्यासक्रमात देशात आणि राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. राणी लक्ष्मीबाई महिलांच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थी श्रावणी चव्हाण हिने ‘फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोसेसर’ अर्थात फळे व भाजीपाला प्रक्रिया या व्यवसाय अभ्यासक्रमात देशात आणि राज्यात प्रथम स्थान पटकावले आहे. दोन्ही प्रशिक्षणार्थ्यांची चिकाटी आणि कठोर परिश्रमांना सचिन कुलकर्णी व मीनल दळी यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाची जोड मिळाली. गट निदेशक, संबंधित संस्थांचे प्राचार्य आणि सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य व प्रोत्साहनही या यशासाठी लाभले. या कामगिरीबद्दल अथर्व आणि श्रावणी यांचे सर्व स्तरांतून कौतुक व अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply