Advertisements
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातल्या कशेडी बोगद्याजवळ आज (२४ ऑगस्ट) मध्यरात्री एका खासगी बसला आग लागून ती जळून खाक झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग लागत असल्याचं चालकाच्या लक्षात येताच त्याने प्रसंगावधान राखून सर्व प्रवाशांना खाली उतरवलं. ही खासगी बस मुंबईवरून मालवणला जात होती. अपघाताचं नेमकं कारण कळलेलं नाही; मात्र टायर फुटून आग लागली असावी, अशी प्राथमिक माहिती आहे. आगीचं वृत्त कळताच खेड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. या अपघातात संपूर्ण बस आणि प्रवाशांचं सामान जळून खाक झालं आहे.
Follow Kokan Media on Social Media
