रत्नागिरी : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातल्या आंबा घाटात आज (पाच डिसेंबर) पहाटे पाचच्या सुमारास खासगी बस सुमारे ५० फूट खोल दरीत कोसळून अपघात झाला. एका अवघड वळणावर झालेला हा अपघात भीषण असला, तरी सुदैवाने जीवितहानी झाली नाही; मात्र ३७ प्रवासी जखमी झाले असून, आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी जवळच्या साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात, तसंच रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, अशी माहिती पोलीस नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली. अपघातग्रस्त बस मध्य प्रदेशातली (MP 13 P 1371) होती आणि रत्नागिरीच्या दिशेने येत होती. आंबा बागेत काम करणारे नेपाळी कामगार त्या बसमधून प्रवास करत होते, अशी प्राथमिक माहिती आहे. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केलं. या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

