मध्य प्रदेशातली खासगी बस आंबा घाटात दरीत कोसळून अपघात; ३७ जण जखमी

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातल्या आंबा घाटात आज (पाच डिसेंबर) पहाटे पाचच्या सुमारास खासगी बस सुमारे ५० फूट खोल दरीत कोसळून अपघात झाला.

हातखंबा अपघात अपडेट; मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक सुरळीत

जयगडवरून कोल्हापूरला एलपीजीची वाहतूक करणाऱ्या ८० मेट्रिक टन क्षमतेच्या खासगी कंपनीच्या टँकरचा काल (२८ जुलै) रात्री साडेअकरा-बारा वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरीजवळ हातखंबा गावात वाणी पेठ इथे अपघात झाला.

निवळी घाटात अपघात; मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद

मुंबई-गोवा महामार्गावर आज (आठ जून) सकाळी रत्नागिरी तालुक्यातील निवळी घाटात बावनदीच्या जवळ मिनी बस आणि एलपीजी वाहतूक करणारा टँकर यांची धडक होऊन अपघात झाला. मुंबई-गोवा महामार्गावरून वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.

मागण्यांमधील विसंगती

एक विसंगत मागणी मंडणगडमधील रिक्षा व्यावसायिकांनी केल्याचे वाचनात आले. मंडणगडमध्ये इंधनाचा पुरवठा सुरळित होत नसल्यामुळे उदरनिर्वाह करणे कठीण असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. इंधनाचा पुरवठा होत नसेल तर तो सुरळित करण्याची त्यांची मागणी अजिबात चुकीची म्हणता येणार नाही. पण त्यांनी तहसीलदारांकडे केलेल्या निवेदनात पेट्रोल पंपावर आपल्याला सौजन्यपूर्वक वागणूक मिळावी, अशी एक मागणी केली आहे. ती वाचल्यावर आश्चर्यच वाटले.