रेल्वे-एसटी करार, प्रवासी वाऱ्यावर

रेल्वे आणि एसटीच्या तिकिटांसाठी झालेल्या सामंजस्य करारापेक्षाही रेल्वेने येणारे प्रवासी हे एसटीचेही प्रवासी आहेत, अशा सामंजस्याच्या भूमिकेने एसटीने सेवा उपलब्ध करून दिली, तर प्रवाशांना त्याची अधिक आवश्यकता आहे. मनमानी भाडे आकारणाऱ्या रिक्षाचालकांना त्यामुळे चाप तर बसेलच, पण एसटीच्या उत्पन्नातही चांगली वाढ होऊ शकेल.

Continue reading

अंकुरलेले साहित्यबीज

बीज अंकुरे अंकुरे नावाचे पुस्तक कोमसाप-मालवण शाखेच्या पुढाकाराने नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनाचा समारंभ मालवण येथे झाला. मधुभाईंनी म्हटल्याप्रमाणे कोकणात साहित्याची बीजे ठिकठिकाणी आहेतच. तिला पूर्ण दिशा दाखविण्याचे काम कोणीतरी करायला हवे आहे. हे काम कोमसाप-मालवण शाखेचे अध्यक्ष आणि पुस्तकाचे संपादक सुरेश ठाकूर यांनी चांगल्या पद्धतीने निभावले आहे.

Continue reading

पत्रकारांची साफसफाई

बेसिनवर पाणी नसणे, भलत्याच ठिकाणाहून पाणी वाहत राहणे, कोपऱ्यांचा पिंकदाणी म्हणून झालेला वापर हा सार्वत्रिक अनुभव आहे. जिल्हाभरातून येणाऱ्या नागरिकांना तो त्रासदायक ठरत असतो. पण नागरिकांचे हित जपण्याचे कंकण बांधलेल्या अधिकाऱ्यांना या किमान सोयीकडे पाहायला वेळ मिळत नाही.

ही स्थिती अधिकाऱ्यांच्या लक्षात यावी, यासाठी अखेर पत्रकारांनी हाती झाडू घेतला. साफसफाई केली. हे काम गौरवास्पद असले तरी पटण्यासारखे नाही. याचे कारण असे की स्वच्छता करणे हे काही पत्रकारांचे काम नाही. अधिकार हे जर अधिकाऱ्यांचे शस्त्र असेल, तर लेखणी हेच पत्रकारांचे शस्त्र आहे. ते बोथट होऊ देऊन चालणार नाही. ते आणखी टोकदार करून अधिकाऱ्यांना त्या त्या बाबतीत सळो की पळो करून सोडण्याची क्षमता पत्रकारांच्या लेखणीमध्ये असली पाहिजे.

Continue reading

बदल्यांचे धोरण आणखी सुधारावे

राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या यापुढे केल्या जाणार नसल्याची माहिती शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडीतील पत्रकार परिषदेत दिली. हा अत्यंत चांगला निर्णय आहे. मुळात बदल्या करूच नयेत, अशा आशयाचे संपादकीय कोकण मीडियाच्या यापूर्वीच्या एका अंकात लिहिले होते. हव्यात कशाला बदल्या, या मथळ्याच्या त्या संपादकीयामध्ये सुचविलेला एक बदल राज्य शासनाच्या निर्णयामुळे प्रत्यक्षात आला आहे.

Continue reading

गैरसोयींचे पारतंत्र्य

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या आढाव्यातील प्रत्येक बाबीचा ऊहापोह करणे शक्य आहे. पिण्याचे पाणी, कचरा, गटारे अशा सर्वसामान्यांच्या मूलभूत समस्या सोडविल्याचे चित्र त्यात दिसत नाही. कोट्यवधींचा खर्च होत असताना लाखाच्या किंवा केवळ काही हजारांच्या खर्चाच्या तरतुदीची अपेक्षा असणाऱ्या सुविधा दुर्लक्षित राहतात. किंबहुना हजार आणि लाखातल्या योजना आखायच्याच नाहीत, असे ठरवून टाकले असावे. त्यामुळे अशा समस्यांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. भारतीय स्वातंत्र्याचा उद्घोष करताना सर्वसामान्य जनता अशा छोट्या छोट्या गैरसोयींच्या पारतंत्र्यातून सुटकेची वाट पाहत असते.

Continue reading

मागण्यांमधील विसंगती

एक विसंगत मागणी मंडणगडमधील रिक्षा व्यावसायिकांनी केल्याचे वाचनात आले. मंडणगडमध्ये इंधनाचा पुरवठा सुरळित होत नसल्यामुळे उदरनिर्वाह करणे कठीण असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. इंधनाचा पुरवठा होत नसेल तर तो सुरळित करण्याची त्यांची मागणी अजिबात चुकीची म्हणता येणार नाही. पण त्यांनी तहसीलदारांकडे केलेल्या निवेदनात पेट्रोल पंपावर आपल्याला सौजन्यपूर्वक वागणूक मिळावी, अशी एक मागणी केली आहे. ती वाचल्यावर आश्चर्यच वाटले.

Continue reading

1 2 3 28