रत्नागिरीत नुकत्याच सुरू झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेशक्षमता शंभर विद्यार्थ्यांची असून आता प्रवेश घेतलेल्या शंभर विद्यार्थ्यांपैकी चार रत्नागिरी जिल्ह्यातले आणि एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातला अशा कोकणातल्या पाच टक्के विद्यार्थ्यांनी तेथे प्रवेश घेतला आहे. ही प्रवेश संख्या पन्नास टक्क्यांपर्यंत जावी, अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी या समारंभात व्यक्त केली, ती योग्यच आहे. पण त्यासाठी अनेक मुद्दे विचारात घेतले जायला हवेत.
