शंभरीच्या स्वातंत्र्यसैनिक : आशाताई पाथरे

महात्मा गांधींनी पुकारलेल्या १९४२ सालच्या भारत छोडो आंदोलनात रत्नागिरीतील आशाताई पाथरे सहभागी झाल्या होत्या. १५ मार्च २०२० रोजी त्या शंभरीत पदार्पण करत आहेत. विद्यार्थिदशेतच स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या आशाताईंना कारावास भोगावा लागला. त्या वेळच्या आठवणी आजही त्यांच्या मनात ताज्या आहेत. शंभरीत पदार्पण करणाऱ्या आशाताईंशी, कोकण मीडियाचे संपादक प्रमोद कोनकर यांनी साधलेला संवाद महाराष्ट्र टाइम्सच्या आजच्या संवाद पुरवणीत प्रसिद्ध झाला आहे.

आता वीजही मिळणार मोफत

कोकण मीडियाच्या सहा मार्च २०२०च्या अंकाचे संपादकीय… राज्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील या तीन पक्षांचे सरकार अधिकारावर आल्यापासून नागरिकांना वेगवेगळ्या आणि मोफत सेवा देण्याच्या घोषणा सातत्याने होत आहेत. अवघ्या दहा रुपयांमध्ये म्हणजेच जवळजवळ फुकट शिवभोजन देण्याच्या क्रांतिकारी योजनेनंतर आता शंभर युनिटपर्यंत वीज मोफत देण्याबाबत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विधिमंडळात केलेली घोषणा हे त्याचेच आणखी एक पुढचे पाऊल आहे.

कुरतडे येथेही आढळली पुरातन कातळशिल्पे

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी दहा हजार वर्षांपूर्वीच्या कातळशिल्पांचा शोध लागला असून दिवसेंदिवस त्यामध्ये भर पडत आहे. कुरतडे (ता. रत्नागिरी) येथेही कातळामध्ये खोदलेल्या काही चित्रकृती निदर्शनाला आल्या असून, त्याबाबत अभ्यास करण्याची आवश्यकता आहे.