रत्नागिरी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचे सहाध्यायी सदानंद भोगले हा सध्या रत्नागिरीत राहणारा कलाकार करोनाप्रतिबंधक लॉकडाऊनमुळे बंद पडलेले कलेतून रोजगाराचे साधन पुनरुज्जीवित होण्याच्या प्रतीक्षेत आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचे सहाध्यायी सदानंद भोगले हा सध्या रत्नागिरीत राहणारा कलाकार करोनाप्रतिबंधक लॉकडाऊनमुळे बंद पडलेले कलेतून रोजगाराचे साधन पुनरुज्जीवित होण्याच्या प्रतीक्षेत आहे.
अडकून राहिलेल्या लोकांना गावोगावी पाठवण्यासाठी आज (आठ मे २०२०) एसटी महामंडळामार्फत ज्या गाड्या सोडण्यात आल्या, त्या गाड्यांमध्ये प्रवाशांकडून नेहमीच्या भाड्याच्या चौपट भाडे आकारले गेले. त्यामुळे रेल्वेच्या निमित्ताने केंद्र सरकारवर टीका करणाऱ्या आणि राज्य सरकारचा भाग असलेल्या काँग्रेसने संवेदनशीलतेचे वेगळेच दर्शन घडवले आहे. जागतिक संकटात राजकारण नको, असे म्हणत सारेच पक्ष राजकारणाचे चांगलेच दर्शन कसे घडवत आहेत, याचा हा नमुना आहे. कोणालाही करोनाच्या संकटात सापडलेल्यांबद्दल यत्किंचितही कणव नाही किंवा जाणीवही नाही, हे त्यातून स्पष्ट होते.
साप्ताहिक कोकण मीडियाच्या आठ मे २०२०च्या अंकाचे संपादकीय…
रत्नागिरी : राजापूर शहरातील बंगलवाडी येथील टायर पंक्चर व्यावसायिक विवेक (पिंट्या) गुरव यांनी एका निराधार आणि अपंग व्यक्तीला माणुसकीचे दर्शन घडवून आधार देतानाच व्यवसाय सुरू करायला मदत करून स्वावलंबीही बनविले. ऑन दी स्पॉट टायर सेवा पुरविणाऱ्या आणि ऑन दी स्पॉट पिंट्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजापूरमधील विवेक ऊर्फ पिंट्या गुरव या कार्यकर्त्याचे कार्य अनेकांना प्रेरणादायी ठरावे.
एक मे 2020च्या अंकाचे संपादकीय…
रत्नागिरी : आजवर मुंबईकर चाकरमान्यांच्या मनिऑर्डरवर कोकणातील चुली पेटत होत्या. मात्र करोनाप्रतिबंधक लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या चाकरमान्यांच्या मुंबईतील चुली पेटण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. गावातच धान्य गोळा केले आणि ते चाकरमान्यांना मुंबईत घरपोच दिलेही.