बेसिनवर पाणी नसणे, भलत्याच ठिकाणाहून पाणी वाहत राहणे, कोपऱ्यांचा पिंकदाणी म्हणून झालेला वापर हा सार्वत्रिक अनुभव आहे. जिल्हाभरातून येणाऱ्या नागरिकांना तो त्रासदायक ठरत असतो. पण नागरिकांचे हित जपण्याचे कंकण बांधलेल्या अधिकाऱ्यांना या किमान सोयीकडे पाहायला वेळ मिळत नाही.
ही स्थिती अधिकाऱ्यांच्या लक्षात यावी, यासाठी अखेर पत्रकारांनी हाती झाडू घेतला. साफसफाई केली. हे काम गौरवास्पद असले तरी पटण्यासारखे नाही. याचे कारण असे की स्वच्छता करणे हे काही पत्रकारांचे काम नाही. अधिकार हे जर अधिकाऱ्यांचे शस्त्र असेल, तर लेखणी हेच पत्रकारांचे शस्त्र आहे. ते बोथट होऊ देऊन चालणार नाही. ते आणखी टोकदार करून अधिकाऱ्यांना त्या त्या बाबतीत सळो की पळो करून सोडण्याची क्षमता पत्रकारांच्या लेखणीमध्ये असली पाहिजे.