देवरूखच्या श्री गणेश वेदपाठशाळेचा २८ वा वर्धापनदिन

देवरूख : येथील श्री गणेश वेदपाठशाळेच्या २८व्या वर्धापन दिनानिमित्त येत्या ७ डिसेंबरपासून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

धार्मिक आणि ज्ञानरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचा प्रारंभ रविवार, दि. ७ डिसेंबर रोजी होणार आहे. ७ ते ९ डिसेंबर या तीन दिवशी सकाळी ८:०० ते १२:३० या वेळेत ‘श्री सूक्त याग’ आयोजित केला जाणार आहे. सायं. ६ ते ८ या वेळेत कॉर्पोरेट कीर्तनकार समीर लिमये यांचे ‘गुरुसेवा’ या विषयावर कीर्तन होणार आहे. दि. ८ डिसेंबर रोजी सायं.६ वाजता गीता उपासनी, पुणे यांचे ‘अध्यात्मवादी सावरकर’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. दि. ९ डिसेंबर या समारोपाच्या दिवशी हभप रोहिणी माने-परांजपे, पुणे यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. त्यांना तबलासाथ केदार लिंगायत आणि हार्मोनियम साथ चैतन्य पटवर्धन (रत्नागिरी) करणार आहेत.

रविवार, दि. ७ डिसेंबर ते मंगळवार दिनांक ९ डिसेंबर, २०२५ रोज रात्री ८:०० ते ९:०० या वेळेत उपस्थित सर्वांसाठी भोजन प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व कार्यक्रमासाठी भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री गणेश पाठशाळेतर्फे करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply