दापोली : दाभोळ (ता. दापोली) येथील डॉक्टर मधुकर लुकतुके यांना मरणोत्तर कृष्णामामा महाजन स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. कोळथरे (ता. दापोली, जि. रत्नागिरी) येथील कै. कृष्णामामा महाजन यांच्या नावाने विविध क्षेत्रातील समर्पित कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘कृष्णामामा महाजन स्मृती पुरस्कार’ देण्यात येतो. वैद्यकीय क्षेत्रात समर्पित कार्य करणारे कै. डॉ. मधुकर लुकतुके यांना या वर्षी या पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित करण्यात येणार आहे.
आयुष्मान भारत मिशन (महाराष्ट्र) संस्थेचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. दाभोळ येथील दत्त मंदराच्या सभागृहात रविवार दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. समारंभाला उपस्थित राहण्याचे आवाहन कृष्णामामा महाजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष बिपिन पाटणे, कोषाध्यक्ष दीपक महाजन आणि कार्यवाह गंगाराम इदाते यांनी केले आहे.



कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

