Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

व्यक्तिमत्त्व विकास व करिअर मार्गदर्शन विषयावरील कार्यशाळा उत्साहात

व्यक्तिमत्त्व विकास व करिअर मार्गदर्शन विषयावरील कार्यशाळा उत्साहात
Advertisements

रत्नागिरी : आत्मविश्वास, प्रामाणिकपणा, सातत्य आणि कौशल्य विकास यांवर भर देत बदलत्या काळानुसार स्वतःला सक्षम बनविण्याचे आवाहन करसल्लागार तथा भारत शिक्षण मंडळाचे सचिव धनेश रायकर यांनी केले. भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात वाणिज्य विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या संयुक्त विद्यमाने व्यक्तिमत्त्व विकास व करिअर मार्गदर्शन या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते.

महाविद्यालयाच्या नाटेकर सभागृहात एक दिवसाची कार्यशाळा उत्साहात झाली. श्री. रायकर यांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकास, प्रभावी संवादकौशल्य, सकारात्मक दृष्टिकोन, वेळेचे व्यवस्थापन तसेच करिअरच्या विविध संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. टॅली कोर्स, स्पर्धा परीक्षांबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात टॅली इन्स्टिट्यूटचे नारायण बांदिवडेकर यांनी विद्यार्थ्यांना टॅली कोर्ससंदर्भात सविस्तर माहिती दिली.

अध्यक्षीय भाषणात प्र. प्राचार्या मधुरा पाटील यांनी विद्यार्थ्यांनी अशा कार्यशाळांचा लाभ घेऊन स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधावा, असे आवाहन केले. वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. राखी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी उपप्राचार्या प्रा. वसुंधरा जाधव, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्रा. विनय बावदाने उपस्थित होते.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version