पटवर्धन हायस्कूलच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवाचा दिमाखात प्रारंभ

पटवर्धन हायस्कूलच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवाचा दिमाखात प्रारंभ

‘संस्थेने जगाच्या पावलांची दिशा ओळखून विद्यार्थी घडवावेत,’ असे
प्रतिपादन भारत शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. अलिमियाँ परकार यांनी पटवर्धन
हायस्कूलच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवाच्या प्रारंभी केले.

व्यक्तिमत्त्व विकास व करिअर मार्गदर्शन विषयावरील कार्यशाळा उत्साहात

व्यक्तिमत्त्व विकास व करिअर मार्गदर्शन विषयावरील कार्यशाळा उत्साहात

भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात वाणिज्य
विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या संयुक्त विद्यमाने व्यक्तिमत्त्व
विकास व करिअर मार्गदर्शन या विषयावरील कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

पालकांनी काय करावे? काय करू नये? बियाणी बालमंदिरात प्रबोधन

रत्नागिरी : येथील भारत शिक्षण मंडळ संचालित पू. सौ.गोदवरीदेवी भ. बियाणी बालमंदिर आणि भिडे आजी खेळघरात पालकांसाठी खास प्रबोधनाचे आयोजन करण्यात आले होते.

रत्नागिरीतील कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

भारत शिक्षण मंडळाच्या नव्या वास्तूमध्ये कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिराचा प्रवेशोत्सव कार्यक्रम आज (१६ जून) उत्साहात पार पडला. ढोल-ताशांच्या गजरात गुलाबपुष्प आणि चाफ्याचे फूल देऊन आणि औक्षण करून मुलांचे स्वागत करण्यात आले. बियाणी बालमंदिर व भिडे आजी खेळघरातही शाळा प्रवेशोत्सव साजरा झाला.

राज्यस्तरीय ज्ञानपीठ स्पर्धेत रत्नागिरीचा डंका; आगाशे विद्यामंदिरचे तीन विद्यार्थी आपापल्या गटात प्रथम

महाराष्ट्र ज्ञानपीठ सामान्य ज्ञान परीक्षेत रत्नागिरीच्या कृष्णाजी चिंतामण आगाशे विद्यामंदिरातील तिघा विद्यार्थ्यांनी आपापल्या गटात राज्यात अव्वल क्रमांक मिळवून विद्यालयाच्या आणि रत्नागिरीच्या नावलौकिकात भर घातली आहे.

कृष्णाजी चिंतामण आगाशे विद्यामंदिरमध्ये निवासी शिबिर

रत्नागिरी : येथील कृष्णाजी चिंतामण प्राथमिक आगाशे विद्यामंदिरात चौथीच्या विद्यार्थ्यांचे एक दिवसाचे निवासी शिबिर घेण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला.