Advertisements
नवी मुंबई : कोकण रेल्वेमार्गावर येत्या ७ नोव्हेंबर रोजी मुंबई सीएसएमटी-मडगाव मार्गावर विशेष गाडी धावणार आहे. 01427 क्रमांकाची ही गाडी एकमार्गी असून परतीचा प्रवास करणार नाही.
ही गाडी ७ नोव्हेंबर रोजी पहाटेपूर्वी १२ वाजून २० मिनिटांनी (६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीनंतर) सुटणार असून बारा तासांनी म्हणजेच दुपारी सव्वाबारा वाजता ती आपला प्रवास पूर्ण करेल. या गाडीचे पुढच्या स्थानकांचे वेळापत्रक असे – दादर (मध्यरात्रीनंतर १२.३२), ठाणे (१.१२), पनवेल (२.०५), रोहा (३.२५), खेड (पहाटे ४.४४), चिपळूण (५.०३), रत्नागिरी (सकाळी ६.३०), कणकवली ८.४४), सावंतवाडी (९.२१) आणि करमळी (१०.४६).
गाडीला १७ डबे असतील. त्यापैकी १५ डबे द्वितीय श्रेणी शयनयान असतील.







