नवी मुंबई : मडगाव ते गोरखपूर या मार्गावर येत्या रविवारी (दि. २३ जानेवारी) कोकण रेल्वे मार्गावरून विशेष गाडी धावणार आहे.
05030 क्रमांकाची ही गाडी २३ जानेवारी रोजी रात्री आठ वाजता मडगाव येथून सुटेल. करमळी, थिवी, सावंतवाडी, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल, कल्याण, नाशिक, भुसावळ, खांडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सटना, माणिकपूर, प्रयागराज, माऊ, भाटनी आणि देवोरिया सदर या स्थानकावर थांबत ही गाडी तिसऱ्या दिवशी सकाळी साडेअकरा वाजता गोरखपूरला पोहोचणार आहे. ही गाडी रात्री नऊ वाजून ४० मिनिटांनी सावंतवाडी, १० वाजून २८ मिनिटांनी, कणकवली मध्यरात्री साडेबारा वाजता रत्नागिरी, तर सोमवारी पहाटे दोन वाजता चिपळूणला पोहोचेल. पनवेलला सकाळी सहा वाजून २० मिनिटांनी, तर कल्याण येथे सकाळी ७ वाजून २७ मिनिटांनी गाडी पोहोचणार आहे
गाडीला १४ डबे असतील. या गाडीचे आरक्षण उद्यापासून (दि. २२ जानेवारी) उपलब्ध होणार आहे. ही गाडी एकाच मार्गावर धावणार असून परतीचा प्रवास करणार नसल्याचे कोकण रेल्वेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड