तिसऱ्या राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलनाची पनवेलमध्ये तयारी

पनवेल : येथील के. गो. लिमये सार्वजनिक ग्रंथालयात जानेवारी २०२४ मध्ये तिसरे राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन होणार असून त्याची तयारी सुरू झाली आहे.

कोकण रेल्वेची ११ नोव्हेंबरला मडगाव-मुंबई विशेष गाडी

नवी मुंबई : कोकण रेल्वेमार्गावर येत्या ११ नोव्हेंबर रोजी मडगाव-मुंबई सीएसएमटी मार्गावर विशेष गाडी धावणार आहे. 01428 क्रमांकाची ही गाडी एकमार्गी असून परतीचा प्रवास करणार नाही. ही गाडी शुक्रवार, ११ नोव्हेंबर रोजी पहाटे साडेतीन वाजता सावंतवाडीतून मुंबईला रवाना होईल.

कोकण रेल्वेची ७ नोव्हेंबरला मुंबई-मडगाव विशेष गाडी

नवी मुंबई : कोकण रेल्वेमार्गावर येत्या ७ नोव्हेंबर रोजी मुंबई सीएसएमटी-मडगाव मार्गावर विशेष गाडी धावणार आहे. 01427 क्रमांकाची ही गाडी एकमार्गी असून परतीचा प्रवास करणार नाही.

संगमेश्वर रेल्वेस्थानकातील फलाट प्रवाशांसाठी जीवघेणा

संगमेश्वर रेल्वेस्थानकातील फलाटाची दुरवस्था झाली असून तो प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे.

कोकणकन्या एक्स्प्रेसच्या दर्जात आणि क्रमांकात २० जानेवारीपासून बदल

नवी मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर दररोज धावणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेस या गाडीच्या दर्जामध्ये आणि क्रमांकातही येत्या २० जानेवारी २०२३ पासून बदल करण्यात येणार आहे. ही गाडी सुपरफास्ट एक्स्प्रेस म्हणून धावणार असून गाडीच्या सध्याच्या 10111/10112 या क्रमांकाऐवजी तो क्रमांक 20111/20112 असा होणार आहे.

गणेशोत्सवासाठी एलटीटी-मंगलुरू वातानुकूलित विशेष रेल्वेगाडी

नवी मुंबई : गणेशोत्सवात मुंबईतून कोकणात येण्यासाठी आतापर्यंत अनेक गाड्या जाहीर झाल्या असून आता एलटीटी-मंगलुरू (क्र. 01165/01166) मार्गावर आणखी एका गाडीची घोषणा करण्यात आली आहे. या पूर्णपणे वातानुकूलित गाडीच्या एकूण चार फेऱ्या होणार आहेत.