गणेशोत्सवासाठी एलटीटी-मंगलुरू वातानुकूलित विशेष रेल्वेगाडी

नवी मुंबई : गणेशोत्सवात मुंबईतून कोकणात येण्यासाठी आतापर्यंत अनेक गाड्या जाहीर झाल्या असून आता एलटीटी-मंगलुरू (क्र. 01165/01166) मार्गावर आणखी एका गाडीची घोषणा करण्यात आली आहे. या पूर्णपणे वातानुकूलित गाडीच्या एकूण चार फेऱ्या होणार आहेत.

एलटीटी-मंगलुरू गाडी (क्र. 01165) दर मंगळवारी १६, २३, ३० ऑगस्ट आणि ६ सप्टेंबर रोजी पहाटेपूर्वी (सोमवारी मध्यरात्रीनंतर) १२ वाजून ४५ मिनिटांनी सुटेल. त्याच दिवशी सायंकाळी साडेसात वाजता ही गाडी मंगलुरूला पोहोचेल. या गाडीचे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेळापत्रक असे – खेड पहाटे 4.30, चिपळूण 5.10, संगमेश्वर 6.16, रत्नागिरी 7.10, राजापूर 8.36, वैभववाडी 8.50, कणकवली 9.40, सिंधुदुर्ग 10.02, कुडाळ 10.18, सावंतवाडी 10.40.

परतीच्या प्रवासाकरिता ही गाडी (क्र. 01166) मंगलुरू येथून त्याच दिवशी रात्री १० वाजून २० मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी साडेसहा वाजता एलटीटीला पोहोचेल. परतीच्या प्रवासाचे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पनवेल, ठाण्याचे वेळापत्रक असे – सावंतवाडी पहाटे 5.50, कुडाळ 6.20, सिंधुदुर्ग 6.44, वैभववाडी 7.54, राजापूर 8.14, रत्नागिरी 10.05, संगमेश्वर 11.00, चिपळूण 12.20, खेड 12.52, पनवेल 16.40, ठाणे 17.40, एलटीटी 18.30.

या गाडीचे तिकीट दर असे – एलटीटी ते चिपळूण – एसी थ्री टायर १०५०, टू टायर १४४०, फर्स्ट क्लास एसी १६९०. एलटीटी ते रत्नागिरी – एसी थ्री टायर १०५०, टू टायर १४४०, फर्स्ट क्लास एसी २०६५. एलटीटी ते कुडाळ– एसी थ्री टायर १२१०, टू टायर १७२०, फर्स्ट क्लास एसी २६५०. गाडीचे आरक्षण सुरू झाले आहे.

ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी या महाराष्ट्रातील थांब्यांवर थांबेल. नंतर ती थिवी, करमळी, मडगाव, काणकोण या गोव्यातील थांब्यांवर थांबून कर्नाटकात रवाना होईल. गाडीला पॅन्ट्री आणि जनरेटर कारसह एकूण २२ एलएचबी डबे असतील. त्यातील प्रथम वर्ग एसी १, टू टायर एसी ३ आणि थ्री टायर एसीचे १५ डबे असतील.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply