‘जरा याद उन्हे भी कर लो’ खुली अखिल भारतीय चित्रकला स्पर्धा

पुणे : भारताच्या स्वातंत्र्य संघर्षामध्ये क्रांतिकारकांचे योगदान अविस्मरणीय आहे. त्यांच्या स्मृती चित्रांमधून जागविण्यासाठी अखिल भारतीय स्तरावरील एका चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सोळा लाखांपर्यंतची बक्षिसे असलेली ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. चित्रकारांना १ ऑगस्ट २०२२ पर्यंत चित्रे पाठवता येणार आहेत.

निर्माण प्रतिष्ठानच्या वतीने आणि भारती विद्यापीठ कला महाविद्यालयाच्या सहयोगाने ‘जरा याद उन्हे भी कर लो’ अखिल भारतीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यावर आधारित ही चित्रकला स्पर्धा आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारी आणि महत्त्वाच्या घटना यांचे महत्व भारतीयांना कळावे, हा या आगळ्यावेगळ्या राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेचा हेतू आहे.

भारतीयांना क्रांतिकारकांच्या योगदानाचे योगदानाचे आणि क्रांतिकारकांचे महत्त्व अधिकाधिक समजावे आणि त्यादृष्टीने त्यांचे स्मरण करीत, त्यांच्या संबंधातील महत्त्वाच्या घटनांना आपल्या दृष्टीने आणि कल्पनेतून जिवंत करीत मनातील सारे काही चित्रांद्वारे कागदावर रेखाटत, उतरवीत, रंगवीत एका वेगळ्या पद्धतीने आठवणींचा जागर करावा आणि आपल्या क्रांतिकारकांबद्दल आदरभाव व्यक्त करावा, भारतीय स्वातंत्र्यांचे मोलही नव्या पिढीला समजावे, या भावनेतून ही अखिल भारतीय स्तरावरील चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील विजेत्यांना सुमारे १६ लाख रुपयांची पारितोषिकेही देण्यात येणार आहेत. निर्माण प्रतिष्ठान या स्पर्धेचे आयोजक असून पुण्याच्या भारतीय विद्यापीठाचा कला विभाग सहयोगी आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्याच्या उपक्रमांतर्गत ही स्पर्धा असून १ ऑगस्टपर्यंत स्पर्धकांना आपली चित्रे पाठवायची आहेत.

स्पर्धा आठ गटांमध्ये होणार असून पहिली ते दहावीपर्यंत आणि वय वर्षे ५१ पर्यंतचे तसेच त्यावरील वयोगटाचे स्पर्धकही यामध्ये सहभागी होऊ शकतील. ऑइल पेंटिंग, वॉटर कलर, अॅक्रेलिक आणि स्केच या माध्यमात चित्रे पाठवता येतील. प्रत्येक ग्रुपसाठी १० पारितोषिके देण्यात येणार असून त्यासोबतच २५ विशेष पारितोषिके देण्यात येणार आहेत. विजेत्यांना रोख पारितोषिके आणि डिजिटल प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. सहभागी स्पर्धकांनाही सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाईल. स्पर्धेनंतर देशातील काही मुख्य शहरांमध्ये स्पर्धेतील चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.

स्पर्धेचे विषय असे – १) भारताच्या स्वातंत्र्ययुद्धातील कोणतीही घटना किंवा व्यक्तिमत्त्व/व्यक्तिमत्त्वे, २) भारताच्या क्रांतिकारी चळवळीतील कोणतीही घटना किंवा व्यक्तिमत्त्व/व्यक्तिमत्त्वे ३) १९४७, १९६२, १९७१ आणि १९९९ च्या भारतीय लष्कराने लढलेल्या युद्धादरम्यानची कोणतीही घटना किंवा व्यक्तिमत्त्व/व्यक्तिमत्त्वे.

स्पर्धेसाठी इच्छुकांनी आपली चित्रे चित्रकलेसाठी वापरण्यात येणाऱ्या कागदावर काढावयाची आहेत. त्यासाठी असणारा आकार म्हणजे १/४ ड्रॉइंग शीट, किंवा कार्टिज पेपर असावा (त्याचा आकार २७.५ सेंमी बाय ३७.५ सेंमी इतका असेल.) स्पर्धेसाठी एकंदर ८ गट असून त्यांना सवलतीने स्पर्धा-प्रवेशमूल्यही ठरविण्यात आले आहे. गट, वय निकष आणि स्पर्धा-प्रवेशमूल्य असे – गट १ – पहिली ते चौथी, गट २ – पाचवी ते सातवी, गट ३ – आठवी ते दहावी. (या तिन्ही गटांना स्पर्धा-प्रवेशमूल्य प्रत्येकी २५ रुपये राहील.) गट ४ – वय २१ वर्षांखालील, गट ५ – वय ३१ वर्षांखालील, गट ६ – वय ४१ वर्षांखालील, गट ७ -वय ५१ वर्षांखालील आणि गट ८ – वय ५१ वर्षांवरील सर्व (या पाचही गटांमधील चित्रकारांना प्रत्येकी १०० रुपये स्पर्धा-प्रवेशमूल्य राहील.)

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी लागेल. त्यासाठी http://www.weoneevents.com या वेबसाइटला भेट द्यावी. सहभागी होण्यासाठी तेथे आपले नाव रजिस्टर करावे. नाव, पत्ता तेथे रजिस्टर (नोंदणी) केल्यानंतर आपल्या चित्राची हार्ड कॉपी पुणे आणि मुंबई येथे पाठवावी लागेल. वेबसाइटवर जाण्यासाठी htpp://rb.gy/iruonc या लिंकवर जावे.
चित्राची हार्ड कॉपी पाठवण्यासाठी पत्ता – पुणे – ऑफबीट डेस्टिनेशन, ६ नेस्टकोन क्राऊन, १३८९ शुक्रवार पेठ, संगम साडी सेंटरच्या मागे, ऑफ बाजीराव रोड, पुणे ४११००२. (मोबाइल – ८७६६०९७८८५). मुंबई – गुरू एंटरप्रायजेस, २३ त्रिमूर्ती कृपा, टिळक मंदिर रोड, पोस्ट ऑफिसजवळ, विलेपार्ले (पूर्व), मुंबई ४०००५७. (मोबाइल ९०८२३७५३८३).

चित्रे पाठविण्याची नियमावली
*) प्रत्येक प्रवेशकाने आपली माहिती ठळक अक्षरात द्यावी. त्यासाठी चित्राच्या मागील बाजूस सुस्पष्ट आणि ठळकपणे अक्षरे लिहावीत.
*) त्यात नाव, नोंदणी क्रमांक (जो वेबसाइटवर नोंदवला गेला आहे तो नोंदवावा), मोबाईल क्रमांक, इमेल आयडी आणि पत्ता असावा.
*) चित्र फ्रेम केलेले नसावे.
*) चित्रासंबंधातील सर्व नोंदी निर्माण प्रतिष्ठानद्वारे वापरल्या जातील. त्या परत केल्या जाणार नाहीत.
पुरस्कार प्रदर्शन आणि सोहळा पुण्यामध्ये होईल.
सर्व सहभागींनी फक्त नोंदणीकृत पोस्टाने किंवा प्रतिष्ठित कुरिअर सेवेद्वारे प्रवेशिका पाठवल्या पाहिजेत.
पोस्टाने किंवा कुरिअर कंपनीद्वारे पार्सल हाताळताना कोणत्याही प्रकारची हानी झाल्यास आयोजक जबाबदार राहणार नाहीत.
जनसंपर्क – मोहन वेदपाठक (९२२३२७२५८७)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply