रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी २८ एप्रिलला चित्रकला स्पर्धा

रत्नागिरी : देवरूख येथील डीकॅडसह विविध संस्थांतर्फे रत्नागिरी जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा २८ एप्रिल २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. मुंबई

भाजयुमोतर्फे बुधवारी शाळाशाळांमध्ये चित्रकला स्पर्धा

रत्नागिरी : येत्या २७ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी “परीक्षा पे चर्चा” या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार असून त्यानिमित्ताने २५ जानेवारी रोजी भाजयुमोतर्फे चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती दक्षिण रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.

पाश्चात्य विद्वानांना गीता अर्थासह पाठ; आपल्याकडे मात्र उपेक्षा : धनंजय चितळे

‘झोंपाळ्यावरची गीता’ या मराठी ओवीरूप पुस्तकाच्या राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी केलेल्या इंग्रजी अनुवादाचे गीता जयंतीच्या औचित्याने तीन डिसेंबर २०२२ रोजी रत्नागिरीत प्रकाशन झाले. चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे कार्याध्यक्ष, व्याख्याते-प्रवचनकार धनंजय चितळे या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

गीता जयंतीदिनी ‘झोंपाळ्यावरची गीता’च्या इंग्रजी अनुवादाचे रत्नागिरीत प्रकाशन; कोकण मीडियाच्या स्पर्धांचे बक्षीस वितरणही होणार

रत्नागिरी : येत्या शनिवारी, तीन डिसेंबर २०२२ रोजी गीता जयंतीचे औचित्य साधून रत्नागिरीत The Geeta in Leisure या पुस्तकाचे आणि ई-बुकचे प्रकाशन होणार आहे. १९१७ साली कवी अनंततनय यांनी लिहिलेल्या ‘झोंपाळ्यावरची गीता’ या पुस्तकाचा हा इंग्रजी अनुवाद रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक राजेंद्रप्रसाद स. मसुरकर यांनी केला आहे. रत्नागिरीच्या सत्त्वश्री प्रकाशनातर्फे (कोकण मीडिया) हे पुस्तक प्रकाशित केले जाणार आहे. तसेच, साप्ताहिक कोकण मीडियाने २०२२च्या दिवाळी अंकासाठी ‘कोकणातील उत्सव’ या विषयावर घेतलेल्या लेख आणि चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभही या वेळी होणार आहे.

कोकण मीडिया दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठाविषयी…

२०२२च्या दिवाळी अंकाच्या निमित्ताने साप्ताहिक कोकण मीडियाने ‘कोकणातील उत्सव’ या विषयावर लेख आणि चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. चित्रकला स्पर्धेत रत्नागिरीतली तरुण कलाकार श्वेता केळकर हिच्या चित्राचा प्रथम क्रमांक आला. तिच्या कलेचा आविष्कार असलेलं शिमगोत्सवाचं चित्र या अंकाच्या मुखपृष्ठावर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. त्याविषयी…

मोडीदर्पण आणि कोकण मीडिया दिवाळी अंकांचे गुरुवारी मुंबईत प्रकाशन

मुंबई : येथील मोडीलिपी मित्रमंडळाचा मोडीदर्पण आणि रत्नागिरीतील कोकण मीडिया या दोन दिवाळी अंकाचे प्रकाशन मुंबईत गुरुवारी (दि. २० ऑक्टोबर) होणार आहे. या समारंभात ‘सुलेखन’कार अच्युत पालव यांना अक्षररत्न पुरस्कार देण्यात येणार आहे.