२०२२च्या दिवाळी अंकाच्या निमित्ताने साप्ताहिक कोकण मीडियाने ‘कोकणातील उत्सव’ या विषयावर लेख आणि चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. चित्रकला स्पर्धेत रत्नागिरीतली तरुण कलाकार श्वेता केळकर हिच्या चित्राचा प्रथम क्रमांक आला. तिच्या कलेचा आविष्कार असलेलं शिमगोत्सवाचं चित्र या अंकाच्या मुखपृष्ठावर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. कोल्हापूरच्या डी. वाय. पाटील कॉलेजमधून बी. आर्च. अर्थात आर्किटेक्ट झालेल्या श्वेताने अलीकडेच आर्ट अँड क्राफ्टचा छोटा व्यवसाय, तसंच आर्किटेक्चरची प्रॅक्टिस सुरू केली आहे.
श्वेताने या स्पर्धेसाठी काढलेलं कोकणातल्या शिमग्याचं चित्र संथाल चित्रशैलीमधलं असून, ते ए फोर कागदावर पोस्टर कलरमध्ये चितारलेलं आहे. अनेक कला, चालीरीती यांनी संपन्न असलेला संथाल हा भारतातला एक मोठा समाज पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार या राज्यांमध्ये विखुरलेला आहे. त्या संस्कृतीमध्ये गायन, वादन, नृत्य आदी कलांना अतिशय महत्त्व आहे. त्यांची चित्रं प्रामुख्याने दैनंदिन जीवन, सणवार, उत्सव, वाद्यं आदी विषयांवर असतात. उंचच्या उंच माणसं, नृत्यमग्न स्त्री-पुरुष, चित्रांमध्ये मूळ सहा रंगांचा विशेष वापर, मोठमोठाली वाद्यं, लांब लांब डोळे व हात ही या चित्रशैलीची वैशिष्ट्यं आहेत. बंगालच्या शैलीत कोकणातल्या शिमग्याचं चित्र काढून श्वेताने दोन्ही ठिकाणच्या उत्सवप्रिय संस्कृतींची आणि कलाप्रेमाची सांगड घालण्याचा प्रयत्न केला आहे.
….
स्पर्धेतले विजेते लेख, अन्य लेख, तसंच अन्य चित्रं आदी साहित्य दिवाळी अंकात समाविष्ट करण्यात आलं आहे. या अंकात पालघर ते सिंधुदुर्ग या कोकणपट्टीतल्या वेगवेगळ्या दैवतांच्या उत्सवांबद्दलच्या एकूण ३४ सुंदर लेखांचा खजिना आहे.
त्याशिवाय कथा, कविता, व्यंगचित्रं आदी फराळही आहेच. एकंदरीतच हा अंक संग्राह्य आणि कोकणाबद्दलच्या वेगळ्या विश्वात घेऊन जाणारा आहे. या अंकातून वाचनानंद तर मिळेलच; पण पर्यटकांना वेगवेगळ्या मंदिरांची माहितीही मिळू शकेल. (अंक घरपोच मागवण्यासंदर्भातील माहिती पुढे दिली आहे.)
पृष्ठसंख्या : १००
मूल्य : १५० रुपये
हा अंक मुंबई, पुणे, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी या शहरांतील प्रमुख वितरकांकडे उपलब्ध आहे.
अंक घरपोच मागवण्यासाठी संपर्क :
मोबाइल : 9422382621, 9850880119
(फक्त) व्हॉट्सअॅप : 9168912621
(व्हॉट्सअॅप नंबरवर आपलं नाव, संपूर्ण पत्ता आणि प्रतींची संख्या कळवावी.)
ई-बुक खरेदीसाठी लिंक :
गुगल प्ले बुक्स – https://play.google.com/store/books/details?id=LzaVEAAAQBAJ
मॅग्झटर – https://www.magzter.com/IN/Kokan-Media-Consultancy–Services/Kokan-Media-/News/1099536
बुकगंगा – https://www.bookganga.com/R/8LC78
अक्षरधारा – https://akshardhara.com/38761-diwali-ank.html
विजेत्यांची चित्रे पाहण्यासाठी, तसेच अंकाचे अंतरंग जाणून घेण्यासाठी पाहा सोबतचा स्लाइडशो आणि व्हिडिओ…

