रत्नागिरी : धामापूर (ता. संगमेश्वर) गावाने यंदाच्या गणेशोत्सवात
लोकमान्य टिळकांच्या मूळ विधायक समाजप्रबोधनाच्या संकल्पनेला उजाळा देत, ‘२०४७
चे विकसित धामापूर’ कसे असेल, याचे स्वप्न गणेश देखाव्यांतून जिवंत केले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : धामापूर (ता. संगमेश्वर) गावाने यंदाच्या गणेशोत्सवात
लोकमान्य टिळकांच्या मूळ विधायक समाजप्रबोधनाच्या संकल्पनेला उजाळा देत, ‘२०४७
चे विकसित धामापूर’ कसे असेल, याचे स्वप्न गणेश देखाव्यांतून जिवंत केले.
रत्नागिरी : दिव्यांगत्व आले म्हणून जीवन थांबत नाही, तर जिद्द,
आत्मविश्वास आणि सकारात्मक विचारांच्या जोरावर प्रत्येक परिस्थितीवर मात करता
येते, हे ५६ वर्षीय मारुती गणपत ढेपसे यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
दोन्ही पायांची ताकद गमावल्यानंतरही त्यांनी हार न मानता पुन्हा आपल्या
व्यवसायाशी नाते जोडले. गणपती विसर्जन मिरवणुकीत काल, दि. १९ सप्टेंबर रोजी
त्यांनी गरुडाची वेशभूषा करून इलेक्ट्रिक तीनचाकीवरून उत्साहात सहभाग घेतला.
त्यांच्या या आगळ्यावेगळ्या सहभागाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रत्नागिरी : येत्या १४ सप्टेंबरपासून कोकणात मोठ्या उत्साहात
गणेशोत्सव सुरू होणार आहे. त्याकरिता रत्नागिरी शहरातील सर्व रस्ते त्या
दिवसापर्यंत खड्डेमुक्त होतील, अशी ग्वाही नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे
यांनी दिली.
रत्नागिरी : गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे संपूर्ण
परिसरात बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता लागली आहे. अनेक मूर्तिशाळांमधून दूरच्या
घरी गणपती बाप्पाच्या मूर्ती रवाना झाल्या आहेत.
नेहमीच येणारा पाऊस, त्यामुळे कोकणवासीयांची उडणारी दाणादाण, नेहमीच येणारा गणेशोत्सव, त्या काळात चाकरमान्यांना भोगावा लागणारा त्रास वर्षानुवर्षे तसाच आहे. वाहतुकीच्या सुविधा पुरविण्याच्या आश्वासनांच्या पावसात रस्ते मात्र वाहून गेले आहेत. यापुढेही ते तसेच वाहत राहतील. सण संपवून चाकरमानी परततील. खड्डे विसरतील. अगदी दरवर्षी येणाऱ्या गणपतीप्रमाणेच पुन्हा पुढच्या वर्षी त्याच खड्ड्यांमधून कोकणात आपापल्या गावी येतील.
ग-ण-प-ती या चार अक्षरांभोवती कोकणी माणसाचं धार्मिक, आध्यात्मिक, भावनिक, सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक, कला आणि श्रद्धा अशा अनेक प्रकारचं विश्व फिरत असतं.