रत्नागिरी : देवरूख येथील डीकॅडसह विविध संस्थांतर्फे रत्नागिरी जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा २८ एप्रिल २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे.
मुंबई विद्यापीठ व महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ व्होकेशनल एज्युकेशन संलग्न कला संचालनालय (महाराष्ट्र शासन) मान्यताप्राप्त क्रेडार संचालित देवरूख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाइन, रत्नागिरी चित्रकला महाविद्यालय, प्रद्योत आर्ट गॅलरी आणि ओम साई मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रत्नागिरी जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा २८ एप्रिल २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धेची वेळ सकाळी ९:३० ते दुपारी १२:३० पर्यंत जेवणाची वेळ १२:३० ते १:३० मार्गदर्शन, प्रात्यक्षिक व बक्षीस वितरण दुपारी १:३० ते ३:०० वाजता असेल. वयोगट – पाचवी ते सातवी व खुला गट प्रत्येक गटामध्ये प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक, उत्तेजनार्थ २ पारितोषिके दिली जाणार आहेत. पारितोषिक स्वरूप सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक व कॅम्लिनतर्फे आकर्षक भेटवस्तू असे असेल.
स्पर्धेचे ठिकाण ओम साई मित्र मंडळ हॉल ( साळवी स्टॉप, नाचणे लिंक रोड, रत्नागिरी) येथे असून अधिक माहितीसाठी कलाशिक्षक अवधूत पोटफोडे (७७७४८५९२१२), सिद्धांत चव्हाण (९४२०१७९३५०), मयूरी घाणेकर भाटकर (७२१८४८८७४४) यांच्याशी संपर्क साधावा.
स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media

