इन्व्हर्टर आणि बॅटरी यांची निवड कशी करावी?

… तर काय कराल?

आजकाल बहुतेक लोक विजेच्या लोडशेडिंगला कंटाळून इन्व्हर्टर आणि बॅटरी घेण्याचा निर्णय घेत आहेत. पण नक्की किती क्षमतेचा इन्व्हर्टर आणि बॅटरी घ्यावी, याबद्दल साशंक आहेत. अशी शंका मनात असेल, तर काय कराल? तो संभ्रम दूर करायचा प्रयत्न.

…..
विजेचे लोडशेडिंग सुरू असेल, तर त्याला पर्याय म्हणून इन्व्हर्टर आणि बॅटरी घेतली जाते. पण नक्की किती क्षमतेचा इन्व्हर्टर आणि बॅटरी घ्यावी, याबद्दल मनात संभ्रम असतो. टेक्निकल भाषेत साइनवेव्ह सर्किट आणि कॉपर ट्रान्स्फॉर्मर असलेला इन्व्हर्टर चांगला. आणि टॉवर ट्युब्युलर आणि वजनदार बॅटरी चांगली. अतिपाऊस आणि विजा चमकत असताना मेन स्विच बंद करणे आणि नंतर न विसरता चालू करणे हितावह ठरते. तसेच इन्व्हर्टर आणि बॅटरी खरेदी करण्यापूर्वी ठरावीक लोडचे वेगळे वायरिंग (इन्व्हर्टर आणि बॅटरीला जोडण्यासाठी) आणि चार्जिंग पॉइंट ही पूर्वतयारी करून घ्यावी लागते. इन्व्हर्टर आणि बॅटरीसाठी हवेशीर आणि सुटसुटीत जागा अपेक्षित असते.

एकावेळी जास्तीत जास्त किती लोड चालवायचा आहे यानुसार इन्व्हर्टरची आवश्यक क्षमता ठरवता येते. उदाहरणार्थ – दोन फॅनचे २०० वॉट (प्रतिफॅन शंभर वॉटप्रमाणे), चार ट्यूबचे २४० वॉट (प्रतिट्यूब ४० आणि चोक २० वॉटप्रमाणे), चार एलईडी बल्बचे ४० वॉट (प्रतिबल्ब १० वॉटप्रमाणे) असा एकूण ४८० वॉटचा लोड होतो. याचे रूपांतर रिव्हर्स कॅल्क्युलेशननुसार ६०० व्ही ए असे होते. (वॉटला पॉइंट आठने भागल्यास व्ही ए होते अंदाजे). म्हणजेच दोन फॅन, चार ट्यूब आणि चार एलईडीचा एकत्रित लोड साधारणतः ६०० व्ही ए (व्होट अॅम्पिअर) असतो. सध्या बाजारपेठेत ७००, ८५०, एक हजार व्ही ए इन्व्हर्टर उपलब्ध आहेत. त्यापैकी ८५० व्ही ए चे मॉडेल निवडायला हरकत नाही.

आपणास ठरावीक लोड सलग किती तास चालवायचा आहे त्यानुसार बॅटरीची आवश्यक क्षमता ठरवता येते.
साधारणतः १५० ए एच (अॅम्पिअर अवर) ची बॅटरी पूर्ण चार्ज असल्यास ४५० वॉटच्या लोडसाठी तीन तास (पंधरा मिनिटे कमी-जास्त) बॅक अप देते. एका वेळी जोडलेली सर्व उपकरणे चालू न ठेवता दोनऐवजी एक फॅन, ट्यूबऐवजी एल ई डी बल्बचा वापर केल्यास (१५० वॉट अ‍ॅक्टिव्ह लोड गृहीत धरून) हा बॅकअप अगदी ८-९ तास मिळू शकतो. बॅटरी पहिल्या वर्षीपेक्षा नंतर नंतरच्या वर्षी बॅकअप कमी देत जाते. बॅटरीचे अपेक्षित आयुष्य पाच वर्षे असते, त्यानंतर बॅटरी बदलावी लागते. बॅटरीमध्ये दर पाच-सहा महिन्यांनी डिस्टिल्ड वॉटर लेव्हल करणे गरजेचे आहे. बाजारपेठेतील १००, १५०, २०० यातील १५० ए एच ची बॅटरी लोकप्रिय आहे.

शक्यतो बॅटरीचा पिरिऑडिक मेन्टेनन्स व्यवस्थित ठेवल्यास आणि चांगल्या दर्जाची बॅटरी खरेदी केलेली असल्यास बॅटरीमध्ये बिघाड व्हायची शक्यता कमी असते. चांगल्या दर्जाच्या इन्व्हर्टरमध्येदेखील अतिपाऊस आणि विजा चमकत असताना मेन स्विच तात्पुरते बंद केले गेल्यास बिघाड होण्याची शक्यता कमी. कधी अनपेक्षितरीत्या व्होल्टेज कमी-जास्त झाल्यास बिघाड संभवतो. बिघाड झालाच तर मात्र जवळच्या ठिकाणी सर्व्हिस सेंटर नसल्याने आणि लोकल मेकॅनिकना स्पेअर पार्ट्स सहज उपलब्ध होत नसल्याने दुरुस्ती-साठी ४, ८ किंवा त्याहून अधिक दिवस लागतात. म्हणून बिघाड होऊच नये, यासाठी घ्यावी लागणारी काळजी अगदी कटाक्षाने घ्यावी.

मनिष सोल्युशन्स
लांजा, जि. रत्नागिरी 416701
एस. व्ही. कुलकर्णी
(बी ई इलेक्ट्रॉनिक्स)
(संपर्क : 9970593910

©.. मनिष सोल्युशन्स, लांजा
डोमेस्टिक अप्लायन्सेस
(एस. व्ही. कुलकर्णी)
(बी ई इलेक्ट्रॉनिक्स)
लांजा 416701
(संपर्क : 9970593910)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply