man in white crew neck t shirt holding stay at home sign

सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाच्या नवबाधितांपेक्षा करोनामुक्त रुग्ण अधिक

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज करोनाचे नवे २११ रुग्ण आढळले, तर त्याहून २१ अधिक म्हणजे २३२ रुग्ण करोनामुक्त झाल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांच्या अहवालात देण्यात आली आहे.

आज (दि. २१ जानेवारी) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या करोनाविषयक अहवालानुसार जिल्ह्यात २०३ तर जिल्ह्याबाहेरील लॅबमध्ये तपासणी केलेल्या ८ जणांसह एकूण २११ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यात सक्रिय असलेल्या १,३४८ रुग्णांपैकी २४ रुग्ण ऑक्सिजनवर असून ९ रुग्ण चिंताजनक अवस्थेत आहेत.

आतापर्यंत जिल्ह्यात ५५ हजार ६०३ रुग्ण बाधित आढळले, तर ५२ हजार ७८६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आज एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाल्याने आतापर्यंत मरण पावलेल्या रुग्णांची संख्या १ हजार ४७३ झाली आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड १७, दोडामार्ग २२, कणकवली २१, कुडाळ ६०, मालवण १९, सावंतवाडी ४८, वैभववाडी १२, वेंगुर्ले ११, जिल्ह्याबाहेरील १.

जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ८९, दोडामार्ग १३०, कणकवली २०३, कुडाळ ३३३, मालवण १२३, सावंतवाडी २५६, वैभववाडी ७१, वेंगुर्ले १२६, जिल्ह्याबाहेरील १७.

आज कुडाळ येथील ७९ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. त्याला उच्च रक्तदाबाचा त्रास होता. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १,४७३ झाली आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १८१, दोडामार्ग – ४५, कणकवली – ३०१, कुडाळ – २४६, मालवण – २९०, सावंतवाडी – २०७, वैभववाडी – ८२, वेंगुर्ले – ११२, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply