रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात नव्या आढळणाऱ्या करोनाबाधितांची संख्या अजूनही २०० च्यावरच आहे. आज (दि. २१ जानेवारी) करोनाचे नवे २२४ रुग्ण आढळले, तर १९७ रुग्ण करोनामुक्त झाले. जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या म्हणजेच एकूण सक्रिय करोनाबाधितांची संख्या १,२९९ झाली आहे. आज तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.
जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ८२ हजार ३७९ झाली आहे, तर आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ७८ हजार ५८२ आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९५.३९ झाली आहे.
जिल्ह्यात आज झालेल्या तपासणीचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ४०० पैकी ३१५ निगेटिव्ह, तर ८५ पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठवलेल्या १,१६७ पैकी १,०२८ नमुने निगेटिव्ह, तर १३९ पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील आठ लाख ८९ हजार ४२ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.
आज जिल्ह्यात सक्रिय असलेल्या १,२९९ रुग्णांपैकी लक्षणे नसलेले १,०५५, तर लक्षणे असलेले २४४ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या १०१७ असून, संस्थात्मक विलगीकरणात २८२ जण आहेत. एकाही रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिलेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये ११९, तर डीसीएचमध्ये १२५ रुग्ण आहेत. सीसीसीमध्ये ३८ रुग्ण आहेत. बाधितांपैकी १८ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. अतिदक्षता विभागात ६ रुग्ण दाखल आहेत.
आधीच्या १ आणि आजच्या २ अशा ३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. त्यामुळे मृतांची आतापर्यंतची एकूण संख्या २४९८ झाली आहे. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ० टक्के होता. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ०.१५ टक्के आहे. एकूण मृत्युदर ३.०३ टक्के आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२२, खेड २२९, गुहागर १७५, चिपळूण ४८२, संगमेश्वर २२४, रत्नागिरी ८३१, लांजा १३०, राजापूर १६६. (एकूण २४९८).
लसीकरणाची स्थिती
रत्नारत्नागिरी जिल्ह्यात २० जानेवारी रोजी करोनाप्रतिबंधक लसीकरणाची ८९ सत्रे पार पडली. त्यात ६३६ जणांनी लशीचा पहिला, तर ४,००९ जणांनी दुसरा डोस घेतला. १८ वर्षांवरच्या एकूण ४,६४५ जणांचे लसीकरण झाले. २० जानेवारीपर्यंतच्या एकूण आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील १० लाख ४४ हजार ३०६ जणांचा पहिला, तर ८ लाख ३ हजार ३५९ जणांचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत. त्यामध्ये १५ ते १७ वयोगटातील २१४, तर बूस्टर डोस घेतलेल्या ५०१ जणांचा समावेश आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड