सिंधुदुर्गनगरी : करोनाप्रतिबंधाचा उपाय म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजपासून रात्री ११ ते सकाळी ५ या वेळेत संचारबंदी लागू केल्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी बजावले आहेत.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
सिंधुदुर्गनगरी : करोनाप्रतिबंधाचा उपाय म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजपासून रात्री ११ ते सकाळी ५ या वेळेत संचारबंदी लागू केल्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी बजावले आहेत.
रत्नागिरी : करोनाचा प्रभाव रोखण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आज पहाटेपासूनच (२२ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १२ वाजल्यापासून) ती लागू झाली असून संचारबंदी किती तारखेपर्यंत लागू राहणार आहे, याचा उल्लेख आदेशात करण्यात आलेला नाही. साथरोग प्रतिबंधक कायद्याचा अवलंब करण्यात आला आहे. रात्री ९ ते सकाळी ५ या वेळेत संचारबंदी लागू राहणार असल्याचे जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
रत्नागिरी : करोनाप्रतिबंधक संचारबंदीबाबत तूर्त कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र येत्या सात-आठ दिवसांमध्ये सोशल डिस्टंसिंग, मास्क वापरणे अशी आवश्यक ती खबरदारी लोकांनी घेतली, तर संचारबंदीची वेळ येणार नाही. ती येऊ नये यासाठी लोकांनी सहकार्य करावे, असे आवाहन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.
राज्यात लॉकडाऊन लावायचा की नाही याचा निर्णय पुढील ८ दिवसांत जनतेने करायचा आहे असे सांगितले. मास्क घाला, शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा. ज्यांना लॉकडाऊन हवा आहे त्यांनी मास्क घालू नये आणि आरोग्याची कुठलीही शिस्त पळू नये असेही ते म्हणाले.
रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१४ जानेवारी) करोनाचे नवे ७ रुग्ण आढळले, तर ३ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज १२ नवे रुग्ण आढळले, तर ३० रुग्ण करोनामुक्त झाले. रत्नागिरी जिल्ह्यात एकाचा करोनामुळे मृत्यू झाला.
रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१३ जानेवारी) करोनाचे नवे १४ रुग्ण आढळले, तर १७ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज २३ नवे रुग्ण आढळले, तर २२ रुग्ण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात एकाचा करोनामुळे मृत्यू झाला.