coronavirus

रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचे नवे १७ रुग्ण, २३ करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २९ जून) १७ नवे रुग्ण आढळले. २३ रुग्ण बरे होऊन घरी गेले.

जिल्ह्यात करोनाचे आतापर्यंत ८४ हजार ७९७ रुग्ण आढळले असून, त्यापैकी ८२ हजार १७३ म्हणजे ९६.९१ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात आज आरटीपीसीआरसाठी १५७ रुग्णांचे नमुने पाठविले होते. त्यातील १५१ निगेटिव्ह, तर ६ पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठविलेल्या २६४ पैकी २५३ निगेटिव्ह, तर ११ पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील नऊ लाख ५२ हजार ६५९ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे. जिल्ह्यात सक्रिय असलेल्या ८६ रुग्णांपैकी लक्षणे नसलेले ६९ रुग्ण गृहविलगीकरणात, तर लक्षणे असलेले १७ रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. चार रुग्णांची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिलेली आहे.

अ‍ॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये ७ आणि डीसीएचमध्ये १० रुग्ण उपचार घेत आहेत. सीसीसीमध्ये एकही रुग्ण दाखल नाही. बाधितांपैकी एकही रुग्ण ऑक्सिजनवर नाही. अतिदक्षता विभागात एकही रुग्ण नाही.

जिल्ह्यात करोनामुळे मरण पावलेल्या रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या २,५३४ एवढीच आहे. जिल्ह्याचा एकूण मृत्युदर २.९९ टक्के आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२३, खेड २३१, गुहागर १८२, चिपळूण ४९०, संगमेश्वर २२९, रत्नागिरी ८४१, लांजा १३२, राजापूर -१६७. (एकूण २५३४).

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply