रत्नागिरी : येथील जिद्दी माउंटेनीअरिंग संस्थेचे संस्थापक सदस्य अरविंद नवेले यांनी, जम्मू-काश्मीर भागातील १७ हजार ६९४ फूट (५ हजार ३९३ मीटर) उंचीचे मचोई शिखर सर केले.
रत्नागिरीतील जिद्दी माउंटेनीअरिंग संस्थेचे संस्थापक सदस्य श्री. नवेले राजस्थानमधील माऊंट आबु येथे अॅडव्हान्स रॉक क्लाइंबिंग कोर्ससाठी गेले होते. त्यांनी यापूर्वी जम्मू-काश्मीरमधील जवाहर इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनीअरिंग आणि विंटर स्पोर्ट्स येथे बेसिक माऊंटेनीअरिंग कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. त्यांची अॅडव्हान्स माउंटेनीअरिंग कोर्स करत असताना कोर्स सीनिअर म्हणून नेमणूक झाली.
श्री. नवेले यांनी आतापर्यंत सह्याद्रीतील सुळके आणि कातळभिंतींची पन्नाशी ओलांडली आहे. ते आमचा क्लाइंबिंग पार्टनर जेआयएम अँड डब्ल्यूएस संस्थेत पहलगाम येथे अॅडव्हान्स माउंटेनीअरिंग कोर्स पूर्ण करायला रत्नागिरीतील करबुडे गावातून गेले आणि बघता बघता एकामागोमाग एक यशाची शिखर गाठू लागले. त्यांनी जम्मू-काश्मीर भागातील द्रास येथील १७ हजार ६९४ फूट म्हणजेच ५ हजार ३९३ मीटर उंचीचे मचोई शिखर यशस्वीरीत्या सर केले. इन्स्टिट्यूटमध्ये कोर्स सुरू होताच त्यांना कोर्स सीनिअर म्हणून नेमणूक झाली. मोठी जबाबदारी अंगावर आली. ती त्यांनी पेलली आणि पूर्ण कोर्समध्ये त्या फिल्डला योग्यतो न्याय दिला. लीड – स्पीड – बॉल्डरिंग अशा सगळ्याच क्लाइंबिंग पद्धतींमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवले. एचएडब्ल्यूएस क्लाइंबिंग नर्सरीमध्ये २६ क्रमांकाच्या पॅचवर केवळ ३५ सेकंदांत लीलया क्लाइंबिंग केले आणि पूर्ण अॅडव्हान्स कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केला. हा कोर्स करताना ते बोल्डरिंग आणि लीड क्लाइंबिंगमध्ये पहिले आले.
श्री. नवेले यांनी यापूर्वी जिद्दी माउंटेनीरिंगच्या माध्यमातून अनेक ट्रेकचे आयोजन करत अनेक कॉलेज तरुणांपासून ते लहान मुले आणि साठी ओलांडलेल्या अनेक व्यक्तींना नवनवीन किल्ल्यांची पदभ्रमंती घडवली. तीन हजार फूट उंचीचा लिंगाणा तसेच वानरलिंगीसारख्या अभेद्य सुळक्यांवर स्वतः चढाई करत अनेक तरुणांनादेखील यावर चढाई करण्याचे प्रशिक्षण देऊन चढाया यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत. जिद्दीच्या मध्यमातून त्यांनी शाळांमधील मुलांचे बेसिक समर कॅम्प घेऊन त्यामधून मुले घडवण्याचेदेखील काम केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.




कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

