दुद्दुम्ऽनाम्ऽनाम्… एक स्मरणरंजन !

रत्नागिरीतील श्रीनिवास सरपोतदार यांनी सुमारे ६० वर्षांपूर्वी आपल्या लहानपणी गावी उत्सवात पाहिलेल्या-अनुभवलेल्या नमन-खेळ्यांच्या स्मरणरंजनावर आधारित लिहिलेल्या लेखाला कोकण मीडियाच्या लेख स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळाले. त्या लेखाची ही एक छोटी झलक. (या लेखातील रेखाचित्रेही श्रीनिवास सरपोतदार यांनीच काढलेली आहेत.)

…..
खेडेगावात त्या काळी रेडिओसुद्धा दुर्मीळ. गावाचे एकत्रित मनोरंजन होण्यासाठी सत्यनारायण पूजा, लग्न-मुंज या निमित्ताने खेळे हे एकमेव साधन. जवळपास वाडीत कोठे खेळे असले, की पाहायला कसे मिळतील, याची चिंता असायची. त्यासाठी दुपारनंतर चांगली झोप काढायची. रात्रीच्या जेवणात लक्ष नसायचेच. घरी काम करणार्‍यांपैकी कोणी तरी गडी खांद्यावरून आम्हाला घेऊन मांडवासमोर मोक्याच्या जागी बसवून गायब व्हायचे. रात्री नऊच्या दरम्यान आम्ही स्थानापन्न झाल्यावर सलटा-झापाच्या मांडवाकडे बघत राहायचो.

कोणी दिवाबत्तीशी झटापट करतोय, कोणी छोटासा असलाच तर पडदा लावतोय, ढोलकी-मृदुंगवाला ‘मुखलेप’ करतोय! नाचणे खेळे आपले अघळपघळ कपडे सावरतायत, कवड्यांच्या, रूप्याच्या/नाण्यांच्या माळा घालतायत, पायात घुंगुरवाळे-तोडे घालतायत, आपापले टाळ शोधतायत, तर मांडवाच्या मागे सोंगे आपली तयारी करतायत. आपापली प्रॉपर्टी-कपडे, धनुष्यबाण, त्रिशूळ, ढाल तलवार इत्यादी आजमावून बघतायत… असा सगळा थरार चालू असायचा. मग दहा वाजल्यानंतर कधी सुरुवात होतेय त्याची आतुरता असायची. नेहमी पाहणार्‍यांना थोडाफार अंदाज असायचा… त्यांच्याकडून मौलिक माहिती मिळायची!

संपूर्ण लेख वाचा साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकात… (अंक घरपोच मागवण्यासंदर्भात, तसेच अंकाच्या अंतरंगासंदर्भात माहिती पुढे दिली आहे.)

स्पर्धेतले विजेते लेख, अन्य लेख, चित्रं आदी साहित्य दिवाळी अंकात समाविष्ट करण्यात आलं आहे. या अंकात पालघर ते सिंधुदुर्ग या कोकणपट्टीतल्या वेगवेगळ्या दैवतांच्या उत्सवांबद्दलच्या एकूण ३४ सुंदर लेखांचा खजिना आहे. त्याशिवाय कथा, कविता, व्यंगचित्रं आदी फराळही आहेच. एकंदरीतच हा अंक संग्राह्य आणि कोकणाबद्दलच्या वेगळ्या विश्वात घेऊन जाणारा आहे. या अंकातून वाचनानंद तर मिळेलच; पण पर्यटकांना वेगवेगळ्या मंदिरांची माहितीही मिळू शकेल.
पृष्ठसंख्या : १००
मूल्य : १५० रुपये

9850880119 या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर आपलं नाव व संपूर्ण पत्ता कळवल्यास अंक घरपोच पाठवला जाईल.

मुंबई, पुणे, रत्नागिरी, सावंतवाडी, कणकवली, लांजा येथील प्रमुख वितरकांकडे अंक उपलब्ध.

ई-बुक खरेदीसाठी लिंक :

गुगल प्ले बुक्स – https://play.google.com/store/books/details?id=LzaVEAAAQBAJ

मॅग्झटर – https://www.magzter.com/IN/Kokan-Media-Consultancy–Services/Kokan-Media-/News/1099536

बुकगंगा – https://www.bookganga.com/R/8LC78 (ऑनलाइन घरपोच मागवण्यासाठी)

अक्षरधारा – https://akshardhara.com/38761-diwali-ank.html (ऑनलाइन घरपोच मागवण्यासाठी)

पायल बुक्स – https://bit.ly/3VTmRyl (ऑनलाइन घरपोच मागवण्यासाठी)

विजेत्यांची चित्रे पाहण्यासाठी, तसेच अंकाचे अंतरंग जाणून घेण्यासाठी पाहा सोबतचा स्लाइडशो आणि व्हिडिओ…

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply