काळानुरूप बदल स्वीकारत लोककलांचे भवितव्य उज्ज्वल : डॉ. मुकुंद कुळे

चिपळूण : ‘नागर आणि अनागर ह्या समांतर जीवनशैली आहेत. त्या दोन्ही एकत्र चालणार आहेत. त्यांचा एकमेकांवर प्रभाव पडत राहणार आहे. नागर कलांना साचेबद्धता असते. याउलट अनागर लोककलांमध्ये गतिमानता आणि लवचीकता असते. काळानुरूप बदल स्वीकारू शकणाऱ्या या लोककलांना उज्ज्वल भवितव्य आहे,’ असे मत मुक्त पत्रकार आणि लोककलांचे अभ्यासक डॉ. मुकुंद कुळे यांनी व्यक्त केले.

मुंबईत अदृश्य रंगकर्मी नमनाचे एकाच दिवशी तीन प्रयोग

मुंबई : येत्या १८ डिसेंबर रोजी प्रेक्षकांना गिरगावच्या साहित्य संघ मंदिरात अदृश्य रंगकर्मी नमन पाहण्याची संधी मिळणार आहे. एकाच दिवशी तीन प्रयोग होणार आहेत.

दुद्दुम्ऽनाम्ऽनाम्… एक स्मरणरंजन !

रत्नागिरीतील श्रीनिवास सरपोतदार यांनी सुमारे ६० वर्षांपूर्वी आपल्या लहानपणी गावी उत्सवात पाहिलेल्या-अनुभवलेल्या नमन-खेळ्यांच्या स्मरणरंजनावर आधारित लिहिलेल्या लेखाला कोकण मीडियाच्या लेख स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळाले. त्या लेखाची ही एक छोटी झलक.