रत्नागिरी : येथील जिद्दी माउंटेनीअरिंग संस्थेचे संस्थापक सदस्य अरविंद नवेले यांनी, जम्मू-काश्मीर भागातील १७ हजार ६९४ फूट (५ हजार ३९३ मीटर) उंचीचे मचोई शिखर सर केले.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : येथील जिद्दी माउंटेनीअरिंग संस्थेचे संस्थापक सदस्य अरविंद नवेले यांनी, जम्मू-काश्मीर भागातील १७ हजार ६९४ फूट (५ हजार ३९३ मीटर) उंचीचे मचोई शिखर सर केले.
रत्नागिरी : स्वतः करोनाबाधित झाल्याने कोविड केअर सेंटरमध्ये दाखल व्हावे लागलेल्या हेल्पिंग हँड्सच्या सदस्यांनी तेथेही मदतीचा हात पुढे करून रुग्णांचे मानसिक स्वास्थ्य जपण्याचे काम चालविले आहे.
रत्नागिरी शहरात करोनाच्या प्रतिबंधासाठी म्हणून चाललेल्या प्रयत्नांची कार्यालये एका परीने करोनाच्या प्रसाराची केंद्रे ठरली आहेत. रॅपिड अँटिजेन आणि आरटीपीसीआर चाचण्यांसाठी स्वॅब घेणारी केंद्रे, या चाचण्यांचे अहवाल देणारा जिल्हा रुग्णालयातील कक्ष, रत्नागिरी रेल्वे स्थानक ही त्याची प्रमुख उदाहरणे आहेत.
करोना प्रतिबंधाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या संचारबंदीच्या काळात नागरिकांना शासनाच्या अत्यावश्यक सेवेतील शासकीय कर्मचारी काम करत आहेतच, पण कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता पूर्णपणे सेवावृत्तीने तीनशे हात प्रशासनाला मदत करत आहेत. जीवनावश्यक वस्तू घरोघरी पोहोचविण्यासाठी विविध सामाजिक संस्था काम करत आहेत.
व्हॉट्सअॅपवरच्या एका मेसेजवर धामापूर तर्फ संगमेश्वर (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) येथील २२ अपंगांच्या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंची मदत रत्नागिरीतून पाठविण्यात आली.
करोनाच्या प्रतिबंधाकरिता संचारबंदी सुरू असल्यामुळे नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याकरिता रत्नागिरीत हेल्पिंग हँड्स ही स्वयंसेवी संस्थांची साखळी प्रशासनाला मदत करत आहे; पण त्याही पलीकडे जाऊन याच साखळीच्या सदस्यांनी अत्यावश्यक सेवेतील एका सेवकाला दुचाकीचे पंक्चर काढून देऊन वेगळ्याच पद्धतीने मदतीचा हात दिला.