रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात काल करोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नव्हता. आज (दि. २८ जून) मात्र एकदम ३० रुग्ण आढळले. त्याहून अधिक एक म्हणजे ३१ रुग्ण बरे होऊन घरी गेले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात काल करोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नव्हता. आज (दि. २८ जून) मात्र एकदम ३० रुग्ण आढळले. त्याहून अधिक एक म्हणजे ३१ रुग्ण बरे होऊन घरी गेले.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज करोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नाही. आज (दि. २७ जून) ५ रुग्ण बरे होऊन घरी गेले.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात करोनाच्या नव्या रुग्णांमध्ये कालच्या तुलनेत आज घट झली. आज (दि. २६ जून) करोनाचे १६ नवे रुग्ण आढळले, तर १३ रुग्ण करोनामुक्त झाले. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा एकदा करोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. आज (दि. २५ जून) करोनाचे २६ नवे रुग्ण आढळले, तर एकमेव रुग्ण करोनामुक्त झाला. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही.
रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : कोविड-१९च्या कारणामुळे ज्या बालकांचे दोन्ही कायदेशीर पालक (आई-वडील) किंवा दत्तक पालकांचं निधन झाले असून, त्यामुळे ती अनाथ झाली आहेत, अशांसाठी पीएम केअर फॉर चिल्ड्रन (PM Cares for Children) हा उपक्रम केंद्र सरकार राबवत असून, त्याला एक वर्ष झाले आहे. या योजनेअंतर्गत आज सकाळी (३० मे २०२२) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेतील पात्र लाभार्थ्यांना वेगवेगळे लाभ उपलब्ध करून देण्याचा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने झाला. रत्नागिरीत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते या योजनेची प्रमाणपत्रे जिल्ह्यातील बालकांना वितरित करण्यात आली.
रत्नागिरी जिल्हा दोन दिवसांपूर्वीच म्हणजे २३ मार्च २०२२ रोजी करोनामुक्त झाला होता. आज (२५ मार्च) झालेल्या तपासणीत पुन्हा एक नवा करोनाबाधित आढळला आहे.