रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात करोनाच्या नव्या रुग्णांमध्ये कालच्या तुलनेत आज घट झली. आज (दि. २६ जून) करोनाचे १६ नवे रुग्ण आढळले, तर १३ रुग्ण करोनामुक्त झाले. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही.
जिल्ह्यात करोनाचे आतापर्यंत ८४ हजार ७५० रुग्ण आढळले असून, त्यापैकी ८२ हजार ११४ म्हणजे ९६.८९ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.
जिल्ह्यात आज झालेल्या तपासणीचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या १३५ पैकी १२८ निगेटिव्ह, तर ७ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठवलेल्या १२८ अहवालांपैकी ११९ रुग्णांचे नमुने निगेटिव्ह, तर ९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यातील नऊ लाख ५१ हजार ७६६ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे. जिल्ह्यात सक्रिय असलेल्या ८३ रुग्णांपैकी लक्षणे नसलेले ७०, तर लक्षणे असलेले १३ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणात ७०, तर संस्थात्मक विलगीकरणात १३ जण आहेत. एकूण १९ रुग्णांची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिली आहे.
अॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये आणि ७, तर डीसीएचमध्ये ६ रुग्ण उपचार घेत आहेत. सीसीसीमध्ये एकही रुग्ण दाखल नाही. बाधितांपैकी एक रुग्ण ऑक्सिजनवर आहे. अतिदक्षता विभागात एकही रुग्ण नाही.
जिल्ह्यात करोनामुळे मरण पावलेल्या रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या २,५३४ एवढीच आहे. जिल्ह्याचा एकूण मृत्युदर २.९९ टक्के आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२३, खेड २३१, गुहागर १८२, चिपळूण ४९०, संगमेश्वर २२९, रत्नागिरी ८४१, लांजा १३२, राजापूर -१६७. (एकूण २५३४).
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
