coronavirus

रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचा पुन्हा प्रवेश; तीन रुग्ण आढळले

रत्नागिरी : करोनाच्या भयंकर जागतिक साथीवर मात केल्यानंतर आता त्याने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्याच्या जेएन वन व्हॅरिएंटचा संसर्ग काही जणांना झाल्याच्या बातम्या राज्यातल्या अनेक ठिकाणांहून येत आहेत. आता करोनाचा रत्नागिरी जिल्ह्यातही पुन्हा एकदा प्रवेश झाला आहे. आज (२७ डिसेंबर २०२३) रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचे तीन रुग्ण आढळून आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. तिन्ही रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात आहेत, असे त्या अहवालात म्हटले आहे. हे रुग्ण जेएन वन व्हॅरिएंटचे आहेत का याबद्दलचा उल्लेख मात्र त्या अहवालात करण्यात आलेला नाही.

रत्नागिरी जिल्ह्यात आजपर्यंत १५५ जणांच्या करोना चाचण्या नकारात्मक आल्या आहेत. त्यात आज केलेल्या ८९ जणांच्या चाचण्यांचा समावेश असून, त्यापैकी तिघांना करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यात आज ११ हजार चाचण्या झाल्या. त्यातून ८७ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. तसंच आज दोन जणांचा मृत्यू झाला.

करोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागल्याने घाबरून न जाता आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply