नवी मुंबई : कोकण रेल्वे मार्गावरून आज (रविवार, दि. २ जानेवारी) मडगाव ते वलसाड (गुजरात) या मार्गावर एक विशेष गाडी सोडण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वेच्या सहकार्याने सोडली जाणार असलेली 01598 क्रमांकाची ही गाडी रविवारी रात्री आठ वाजता मडगाव येथून वलसाडसाठी रवाना होईल. गाडीचे थांबे आणि वेळ (कंसात) अशी – करमळी (रात्री ८.३०), थिवी (रात्री ८.५०), सावंतवाडी (रात्री ९.२०), कुडाळ (रात्री ९.३८), सिंधुदुर्ग (रात्री ९.५०), कणकवली (रात्री १०.३०), वैभववाडी (रात्री ११.०२), राजापूर (रात्री ११.२२), रत्नागिरी (मध्यरात्रीनंतर १२.३०), संगमेश्वर (मध्यरात्रीनंतर १.०४), चिपळूण (मध्यरात्रीनंतर १.५०), खेड (मध्यरात्रीनंतर २.३०), माणगाव (पहाटे ३.५०), रोहा (पहाटे ५.००), पनवेल (पहाटे ६.००), , वसई (सकाळी ७.५०) आणि वलसाड (सकाळी १०.३० वाजता. गाडीला १५ डबे असतील. त्यापैकी १३ शयनयान असतील.
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरून रविवारी (दि. २ जानेवारी) मडगाव ते वलसाड (गुजरात) या मार्गावर एक विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. 01598 क्रमांकाची ही गाडी रविवारी रात्री आठ वाजता मडगाव येथून वलसाडसाठी रवाना होईल. ही गाडी करमळी, थिवी, सावंतवाडी, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पनवेल, आणि वसई येथे थांबेल. गाडीला १५ डबे असतील. त्यापैकी १३ शयनयान असतील.