Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेची दसरा-दिवाळी ठेव योजना

Advertisements

रत्नागिरी : येथील स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेची लोकप्रिय असलेली आणि सणांचे औचित्य अधिक उत्सवी करण्यासाठी प्रतिवर्षी घोषित होणारी दसरा दिवाळी स्वागत ठेव योजना येत्या १५ ऑक्टोबर २०२३ पासून सुरू होत आहे, अशी माहिती अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.

दसरा-दिवाळी स्वागत ठेव योजनेत आकर्षक व्याजदर पतसंस्थेने निश्चित केले असून स्वरूपाजंली ठेव योजनेसाठी सर्वसामान्यांना ८ टक्के, तर महिला, व ज्येष्ठ नागरिकांना ८.२५ टक्के व्याजदर मिळेल. ठेव कालावधी १२ ते १८ महिने असेल. सोहम ठेव योजना १९ ते ३६ महिन्यांसाठी असून सर्वसामान्य व्याजदर ८.२५ टक्के, तर महिला व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी ८.५० टक्के व्याजदर राहणार आहे. पाच लाखांपेक्षा अधिक एकरकमी ठेव ठेवणाऱ्या ठेवीदारांसाठी ८.६० टक्के व्याजदर १२ ते १८ महिने या योजनेसाठी राहणार आहे.

दसरा-दिवाळी ठेव योजनेत सर्वदूर संपर्क करून ठेवीदारांना ठेव गुंतवणुकीसाठी आकृष्ट करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संस्थेच्या सर्व १७ शाखा कार्यालयात या उत्सवी ठेव योजनेचे औचित्य ठेवत ठेवीदारांच्या स्वागताची जय्यत तयारी ठेवण्यात आली आहे.

स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेत आजअखेर २९१ कोटींच्या ठेवी असून २०३ कोटींची कर्जे, १३१ कोटींची गुंतवणूक, ४२ कोटी १५ लाखांचा स्वनिधी, ९९.३२ टक्के वसुली, ६०.८४ टक्के सीडी रेशो, २५ टक्के सीआरएआर, शून्य टक्के एनपीए, अ ऑडिट वर्ग, ३४४ कोटींचे खेळत भांडवल अशी ठेवीदारांना आश्वस्त करणारी भक्कम आकडेवारी स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने राखली आहे.

तीनशे कोटी रुपयांच्या ठेव संकलनाचा टप्पा गाठण्यासाठी संस्थेला केवळ ९ कोटींची आवश्यकता आहे. दसरा दिवाळी ठेववृद्धी मासाच्या या अभियानात ३०० कोटींचा ठेव टप्पा पूर्ण होईल आणि ३०० कोटींच्या ठेवी असलेली पतसंस्था म्हणून स्वामी स्वरूपानंद पतसंस्था ही बिरुदावली ठेवीदारांच्या प्रतिसादामधून पतसंस्थेला प्राप्त होईल, असा विश्वास ॲड. पटवर्धन यांनी व्यक्त केला आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version