रत्नागिरी : रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्रात खास रत्नागिरी शहरातील नागरिकांसाठी मोफत योग शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
हे शिबिर रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रातील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक योगभवनात होणार आहे. शिबिराचा कालावधी एकूण पंधरा दिवसांचा असून हे शिबिर १६ डिसेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान दररोज सायंकाळी ५ वाजता होणार आहे. मोफत शिबिर असल्यामुळे आरोग्याची गुरुकिल्ली एक प्रकारे या शिबिरातून रत्नागिरीकरांना प्राप्त होणार आहे.
इच्छुक नागरिकांनी https://forms.gle/asQ7baBQMbUtju9t9 या लिंकवर जाऊन आपली नोंदणी करावी. तसेच ७७९८४९०६१५ या क्रमांकावर संपर्क साधावा.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड







