रत्नागिरीत १० ते २५ मार्च या कालावधीत निःशुल्क योगशिबिर

रत्नागिरी : रत्नागिरीकरांच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्राच्या रत्नागिरी उपकेंद्रात पुन्हा निःशुल्क योगशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे निःशुल्क योगशिबिर १० मार्च ते २५ मार्च २०२५ या कालावधीत होणार आहे. अरिहंत मॉल येथील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रात दररोज सायंकाळी साडेपाच वाजता हे शिबिर होणार आहे. याचा जास्तीत जास्त फायदा नोकरदार वर्गाला होऊ शकतो. विशेष बाब म्हणजे सहभागी नागरिकांना प्रमाणपत्रदेखील दिले जाणार आहे. त्यामुळे रत्नागिरी शहरातील विद्यार्थी, नोकरदार, गृहिणी यांनी जराही वेळ न दवडता आरोग्य सुदृढ करणाऱ्या या निःशुल्क योग शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहितीसाठी योग प्रशिक्षक प्रा. अक्षय माळी (७७९८४९०६१५) यांच्याशी संपर्क साधावा. शिवाय पुढील लिंकवरून आपला फॉर्म भरावा. https://forms.gle/p9dMnN9BReru49jQ9

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड


Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply